Saturday, June 20, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तराज्यात ओबीसी वसतिगृह सुरू होणारा पहिला जिल्हा ठरला भंडारा...

राज्यात ओबीसी वसतिगृह सुरू होणारा पहिला जिल्हा ठरला भंडारा…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-अनेक वर्षांपासून रखडलेल्या ओबीसी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाचा प्रश्न आता निकाली निघाला आहे.भंडारा येथे ओबीसी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी प्रत्येकी १०० क्षमतेचे वसतिगृह आज,बुधवार दिनांक-१४ ऑगस्टला सुरू झाले आहे.राज्यात ओबीसी वसतिगृह सुरू होणारा भंडारा हा पहिला जिल्हा ठरला आहे.
ओबीसी,व्हीजेएनटी,एसबीसी समाज शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे.वसतीगृहाची सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांना शहरात उच्च शिक्षणासाठी भाड्याने खोली घेऊन राहावे लागते.परिणामी उच्च शिक्षणाची आवड असतानाही अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतात.या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी २०२२च्या हिवाळी अधिवेशनात राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांत मुला-मुलींसाठी प्रत्येकी १०० विद्यार्थी क्षमतेचे दोन वसतिगृह सुरू करण्याची घोषणा सरकारने केली होती.हे वसतिगृह भाडे तत्वावर असलेल्या इमारतीत सुरू करायचे असल्याने इमारतींचा शोध सुरू झाला होता.परंतु, बराच कालावधी लोटूनही इमारती मिळण्यास विलंब झाला. २०२३मध्ये पावसाळी अधिवेशनात १५ ऑगस्टपर्यंत वस्तीगृह सुरू होतील,असे सरकारकडून आश्वासन मिळाले होते.नागपुरातील हिवाळी अधिवेशनात १८ डिसेंबर २०२३ ला महिनाभरात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.परंतु,वसतिगृह सुरू होण्याचा मुहूर्त निघत नव्हता.या संपूर्ण दिरंगाईमुळे ओबीसी संघटनांमध्ये रोष व्यक्त होत होता.
या रोषाची दखल घेत शासनाने तातडीने वसतिगृहांसाठी इमारती निश्चित करण्यास सुरुवात केली.त्यानुसार भंडारा येथे राष्ट्रीय महामार्गावरील इंद्रलोक सभागृहाच्या मागे ओबीसी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी इमारती निश्चित करण्यात आल्या आहेत.हे वसतीगृह १४ ऑगस्टपासून सुरू करण्यात आले आहे.विशेष म्हणजे,राज्यात सर्वप्रथम भंडारा येथे इमारती निश्चित करुन वसतिगृत सुरू करण्यात आले आहे.वसतिगृहात ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले ते आता तिथे राहू शकणार आहेत.वसतिगृहात साहित्यांचा पुरवठाही झालेला असून कर्मचारीही नियुक्त करण्यात आले आहे.त्यामुळे ओबीसी संघटनांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.
भंडारा जिल्ह्यात ओबीसी वसतिगृहासाठी खासगी इमारती निश्चित झाल्या आहेत.याशिवाय सारथी वसतिगृह,अनुसूचित जातीचे ५ वसतिगृह व अन्य खासगी इमारतीत असलेल्या सर्व शासकीय वसतिगृहांसाठी शासकीय जागासुद्धा निश्चित करण्यात आल्या आहेत.या जागांसाठीचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आला आहे.त्याला लवकरच मंजूरी मिळणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तीन तिघडा अन् काम बिघडा..! वन परिक्षेत्र अधिकारी,वनरक्षक व खाजगी इसम एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त गडचिरोली :-अनेकांना वाटतेय की,एखाद्या तिसऱ्याच व्यक्तींच्या माध्यमातून पैश्याची रक्कम घेतली,तर आपले नाव वा आपली करणी उजेडात येणार नाही.पण,लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तसला...

गडचिरोली जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांमुळे लक्षणीय पाणीसाठा निर्माण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात मागील दोन वर्षांत विविध योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत.या कामांमुळे जिल्ह्यात लक्षणीय पाणीसाठा निर्माण झाला असून...

आता भाडेपट्ट्यावरील शासकीय जमिनींच्या अधिकार अभिलेखात असणार ‘महाराष्ट्र शासन’ कब्जेदार..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील भाडेपट्ट्याने प्रदान करण्यात आलेल्या शासकीय जमिनींच्या अधिकार अभिलेखातील नोंदी अधिक अचूक,पारदर्शक आणि एकसमान करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.मुख्यमंत्री...

वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागभीड तालुक्यातील गिरगाव येथे आज,शुक्रवार १९ जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.आत्माराम दसरू बोरकर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!