Wednesday, September 23, 2026
Homeभंडारारेती वाहून नेणाऱ्या टिप्परची दुचाकीला धडक; पत्नी जागीच ठार तर पती गंभीर...

रेती वाहून नेणाऱ्या टिप्परची दुचाकीला धडक; पत्नी जागीच ठार तर पती गंभीर जखमी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-रेती वाहून नेणाऱ्या भरधाव टिप्परची दुचाकीला धडक बसताच दुचाकीवरील पत्नी जागीच ठार झाली.तर पती गंभीर जखमी झाल्याची घटना काल,बुधवारी ८ जानेवारीच्या दुपारी १२ वाजताच्या सुमारास पवनीच्या वैनगंगा नदी पुलावर घडली.दर्शना शिवशंकर चौरे वय ३२ वर्षे असे मृत महिलेचे नाव आहे.तर शिवशंकर रामदास चौरे वय ३८ वर्षे,रा. इटगाव असे जखमीचे नाव आहे.इटगाव येथून शिवशंकर चौरे हे एमएच-३६ एएफ-७३८९ क्रमांकाच्या मोटरसायकलने पत्नी दर्शना यांना घेऊन ग्रामीण रुग्णालय पवनी येथे गेले होते.पवनीवरून इटगाव येथे परत जात असतांना त्यांच्या मोटरसायकला समोरून येणाऱ्या टिप्परने जबर धडक दिली.यात मोटरसायकलवरून पत्नी दर्शना चौरे ही खाली कोसळली.डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला.तर यात दुचाकी चालक रामदास चौरे गंभीर जखमी झाले.त्यांना प्रथमोपचार करून पुढील उपचाराकरिता नागपूर येथे हलविण्यात आले आहे.याप्रकरणी पवनी पोलिसांनी घटनेची नोंद केली,असून पुढील तपास ठाणेदार निलेश ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल राहाटे करित आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ग्राम रोजगार सेवकांसाठी आनंदाची बातमी; मानधन आणि सेवा अटींचा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी.. – आठ हजार रुपये मिळणार मानधन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र रोजगार हमी (विकसीत भारत रोजगार व आजीविका(ग्रामीण) योजना),२०२६ तसेच तत्कालिन महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत ग्रामपंचायत पातळीवर सरपंच व ग्रामसेवक...

गडचिरोली जिल्ह्यातील २४ प्रकल्पांत ७६.१२ टक्के उपयुक्त पाणीसाठा.. – दुष्काळ परिस्थितीबाबत अद्याप कोणताही अंतिम निष्कर्ष नाही..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थितीच्या अनुषंगाने पर्जन्यमान,पीकस्थिती,जलसाठा,भूजल पातळी तसेच शासनाने निर्धारित केलेल्या विविध निर्देशकांचा प्रशासकीय पातळीवर सविस्तर आढावा घेण्यात आला.जिल्ह्यातील पाऊस व पीक...

बँक ग्राहकांना दिलासा देणारी बातमी; संपाच्या पार्श्वभूमीवर सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार बँक..

उद्रेक न्युज वृत्त :-बँक ग्राहकांना दिलासा देणारी बातमी असून युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने (यूएफबीयू)२८ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत पुकारलेल्या तीन दिवसीय...

बदलते हवामान; पाऊस घालणार थैमान..!

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या हवामान बदलाचे संकेत असल्याने विदर्भातील नागपूर,यवतमाळ,चंद्रपूर, गोंदिया,भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यांसह मुंबई मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर वाढणार आहे.हवामान विभागाच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!