Thursday, July 30, 2026
Homeगडचिरोली१० लाखाचे बक्षीस असलेल्या दोन महिला नक्षल्यांचे आत्मसमर्पण...

१० लाखाचे बक्षीस असलेल्या दोन महिला नक्षल्यांचे आत्मसमर्पण…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-शासनाने १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केलेल्या दोन जहाल महिला नक्षल्यांनी गडचिरोली पोलिसांसमोर काल,बुधवारी ८ जानेवारीला आत्मसमर्पण केले.शामला झुरू पुडो उर्फ लीला कंपनी क्र.१० पीपीसीएम सेक्शन कमांडर वय ३६ वर्षे, रा. गट्टेपल्ली,ता.एटापल्ली व काजल मंगरू वड्डे उर्फ लिम्मी भामरागड दलम सदस्य वय २४ वर्षे,रा. नेलगुंडा, ता.भामरागड अशी आत्मसमर्पित नक्षल्यांची नावे आहेत.आत्मसमर्पण योजनेअंतर्गत आजपर्यंत एकूण ६९३ माओवाद्यांनी गडचिरोली पोलिस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे.सदर माओवाद्याचे आत्मसमर्पण घडवून मुख्य प्रवाहात आणण्याबाबतची कारवाई पोलिस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) नागपूर संदीप पाटील, पोलिस उपमहानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र अंकित गोयल, पोलिस उपमहानिरीक्षक (अभियान) सीआरपीएफ अजयकुमार शर्मा,जिल्हा पोलिस अधीक्षक नीलोत्पल, कमांण्डट ११३ बटालियान सीआरपीएफ जसवीर सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

लाखो रुपयांचा विदेशी दारूसाठा जप्त; कार ठेवून पळाला आरोपी..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अवैधरीत्या दारूची वाहतूक करणाऱ्या कारचा पाठलाग करण्यात आला.दरम्यान,चालकाने पोलिसांना चकमा देण्याचा प्रयत्न केला खरी,पण त्याचा प्रयत्न...

ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी; …अन्यथा एसटी बसची मिळणारी सवलत होणार बंद..!

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड(NCMC)अनिवार्य करण्यात आले आहे. त्यानुसार,येत्या शनिवार...

देसाईगंज येथे स्काऊट-गाईड विषयावरील मार्गदर्शन व उजळणी वर्ग उत्साहात संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-भारत स्काऊट-गाईड्स जिल्हा कार्यालय गडचिरोली व जिल्हा परिषद शिक्षण विभाग (प्राथमिक/माध्यमिक)गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच राजर्षी शाहू महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक...

आईसह दोन चिमुकल्या नदी व नाल्याच्या मधोमध अडकून पडल्या; धाडसी बचावकार्य..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यात काल बुधवारी दिवसभर सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पामुलगौतम नदीसह परिसरातील नाल्यांना अचानक पूर आल्याने लाहेरी येथील एकाच कुटुंबातील तीन...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!