उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,रुग्णालय येथे जिल्हासह बाहेर जिल्हातील रुग्ण उपचाराकरिता येत असतात.त्यामुळे रुग्णांचे समाधान होईल; असे उपचार येथे झाले पाहिजे.रुग्णांशी तथा त्यांच्या नातलगांशी आपली वागणुक योग्य असली पाहिजे. अशा सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहे.रुग्णालयातील अनेक वॉर्डात पिण्याच्या पाण्याची समस्या आहे.ती तात्काळ दुर करा.आपण येथे १०० पिण्याच्या पाण्याच्या कॅन उपलब्ध करून दिल्या आहेत.येथील पाण्याची समस्या सोडविण्यासाठी आणखी काही उपाययोजना असेल तर त्या रुग्णालय प्रशासनाने सुचवाव्यात अशा सूचनाही आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहे.
रुग्णालयातील ब्लड स्टेटींग लॅबच्या बाबतीतही अनेक तक्रारी आहेत.रुग्णांच्या रक्ताचा नमुना प्राप्त झाल्या नंतर त्याचा अहवाल कमीत कमी वेळेत देण्याचा प्रयत्न करा; ब्लड लॅब येथील व्यवस्था सुसज्ज करा, आयसीयूच्या अनेक बेडवर ऑक्सिजन व्यवस्था सुरळीत करण्याच्या सूचनाही यावेळी त्यांनी केल्या. पाहणी दरम्यान प्रसुतीकक्षात रुग्णांना बाहेरून औषध
लिहून देत असल्याची तक्रार रुग्णांनी केली.यावर आमदार किशोर जोरगेवार यांनी चांगलाच संताप व्यक्त केला.रुग्णालयात औषधसाठा उपलब्ध असतानाही बाहेरून औधष आणायला लावणे हा प्रकार गंभीर आहे.यापुढे हे खपवून घेतल्या जाणार नाही.हे प्रकार बंद करा अशा सूचना यावेळी त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या आहेत.
आमदार किशोर जोरगेवार यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयाची पाहणी केली.यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बंडू रामटेके,उप निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. चांदेकर, डॉ. तेजस्वीनी चौधरी, डॉ. रोहित होरे, डॉ. प्रशांत मगदुम, डॉ. ऋतुजा गनगारडे आदींची उपस्थिती होती.