Tuesday, September 22, 2026
Homeवर्धारान डुक्कर आडवे आल्याने कार अनियंत्रित होऊन डिझेल टँकरला धडकली.. - कार...

रान डुक्कर आडवे आल्याने कार अनियंत्रित होऊन डिझेल टँकरला धडकली.. – कार धडकेत पोलीस कर्मचाऱ्याचे अख्खे कुटंब मृत्युमुखी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
वर्धा :-मध्यरात्रीच्या सुमारास वर्धा जिल्ह्याच्या समुद्रपूर तालुक्यातील मांडगाव येथून कारने आपल्या कुटुंबीयांसह वर्ध्याच्या दिशेने येत असतांना तरोडा गाव नजीक मार्गावर रान डुक्कर आडवे आल्याने कार अनियंत्रित होऊन समोरून येणाऱ्या डिझेल टँकरला धडकली.यात पोलीस कर्मचारी असलेल्या प्रशांत वैद्य यांच्या पत्नी प्रियंका वैद्य आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला.तर प्रशांत वैद्य व मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.तीन वर्षांचा मुलगा तर पाच वर्षांच्या मुलीचा मृतकांमध्ये समावेश आहे.
काल,सोमवारच्या मध्यरात्री कारची टँकरला धडक झाल्याने भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघा जणांना प्राण गमवावे लागले आहे.पोलीस कर्मचाऱ्याचे संपूर्ण कुटुंब या अपघातात मृत्युमुखी पडले असून वर्ध्याच्या तरोडा नजीक हा अपघात झाला.पती पत्नी आणि दोन मुले असे चौघे जण अपघातात ठार झाले.पोलीस कुटुंब मांडगाव येथून वर्ध्याकडे येत असतांना कारची टँकरला धडक बसली आणि अख्खे कुटुंबच मृत्युमुखी पडल्याने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भरधाव वाहनाच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने जंगल परिसरातून मार्गक्रमण करीत महामार्ग ओलांडणाऱ्या वाघिणीला जोरदार धडक दिल्याने धडकेत वाघिणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज,मंगळवार २२...

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल वाजला.. -शिक्षक-पदवीधर मतदार संघात कोण मारणार बाजी?

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी निवडणूक आयोगाने जाहीर केला.त्यानुसार,तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा करण्यात...

जन सेवेतुनच खरी इश्वराची आराधना-किशन नागदेवे -साई मंदिर देवस्थान समितीच्या उपक्रमातून तब्बल २ हजार ५०० रुग्णांची मोफत तपासणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज येथील राजेंद्र  वार्डातील प्रसिद्ध साई मंदिर देवस्थान समितीच्या वतीने आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव निमित्त  मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आला.या...

‘लोकसंवाद-२०२६’मधून रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष जनजागृती कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवानिमित्त माहिती व जनसंपर्क विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद- २०२६’ उपक्रमांतर्गत आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!