Sunday, September 6, 2026
Homeआरमोरीरब्बी धान खरेदी केंद्रे तात्काळ सुरू करा- आमदार रामदास मसराम

रब्बी धान खरेदी केंद्रे तात्काळ सुरू करा- आमदार रामदास मसराम

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
आरमोरी(गडचिरोली):-परिसरात रब्बी हंगामातील धानाची कापणी झाली असल्याने मोठ्या प्रमाणात धान विक्री करीता बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे.मात्र,शासनाकडून अद्यापही धान खरेदीसाठी आवश्यक गोदामांची व्यवस्था करण्यात आलेली नाही.तसेच अनेक ठिकाणी शासकीय धान खरेदी केंद्रे सुरू न झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
शासकीय खरेदी केंद्र बंद असल्याने शेतकरी हतबल आपले धान खुले बाजारात कमी दराने विकत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून त्यांच्या मेहनतीला योग्य मोबदला मिळत नाही.ही परिस्थिती अत्यंत गंभीर असून प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.यासंदर्भात आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी शासन व संबंधित प्रशासनाला मागणी करत लवकरात लवकर आवश्यक गोदामांची व्यवस्था करून शासकीय धान खरेदी केंद्रे सुरू करण्याची मागणी केली आहे.शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन तात्काळ निर्णय घेण्यात यावा,अन्यथा शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच धान खरेदी प्रक्रिया पारदर्शक व सुरळीतपणे राबवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा,अशी मागणीही आमदार मसराम यांनी केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

तलावात मासे पकडत असतांनाच पाय घसरल्याने तलावात पडला; चिमुकल्याचा तलावात बुडून मृत्यू.. -दुसऱ्या घटनेत भारतीय सैन्य दलातील जवानाचा पाण्यात बुडून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील निलज गावातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. शाळेला सुट्टी असल्याने मित्रांसोबत गाव नजीकच्या तलावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!