Saturday, May 2, 2026
Homeभंडाराम्हशीच्या पिल्लाची बिबट्याने केली शिकार..

म्हशीच्या पिल्लाची बिबट्याने केली शिकार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-हल्ली वाघांसह बिबट्याच्या हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे.जंगलातील प्राण्यांसह बिबट्या गावात मुसंडी मारून पाळीव प्राण्यांची शिकार करू लागला आहे.अशातच गावात येऊन गोठ्यात बांधलेल्या शेळ्या,बोकड व इतर पशूंना भक्ष करू लागल्याने गावातील नागरिक भयभीत झाले आहेत.अश्याच प्रकारे भंडारा जिल्ह्याच्या पालोरा वनविभाग कार्यालय शेजारील लवंकुश महादेव कुकडे यांच्या घराच्या गोठ्यात बांधलेल्या म्हशीच्या पिल्लाची (वघार) बिबट्याने शिकार केली आहे.बिबट्याने वासराला दोरखंडा सह १०० मीटर अंतरावर फरफटत नेले असल्याची घटना काल,शनिवारी १८ जानेवारी रोजी पालोरा येथे उघडकीस आल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.पशुपालक लवंकुश कुकडे यांनी नेहमीप्रमाणे आपली जनावरे घरातील गोठ्यात बांधली होती.कुकडे कुटुंबीय पहाटे झोपेतून जागे झाले.गोठ्यातील वघार न दिसल्यामुळे त्यांनी शोधाशोध केली.शोधाशोध केल्यानंतर वघार घरापासून १०० मीटर अंतरावर आढळून आल्याने सदरची घटना उघडकीस आली.सदर घटनेची माहती वनविभागाला दिली गेली.त्यानुसार तुमसरचे वनपरिक्षेत्र अधिकारी सी.जी.रहांगडाले,क्षेत्र सहायक अस्लाम शेख यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. सदर घटनेने गावकरी बिबट्याच्या दहशतीत सोडण्यापूर्वी बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा; अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

लाडक्या बहिणींना मोठा झटका; लाखो महिला अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील अनेक कुटुंबांसाठी आधार देणारी व महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणारी महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकारने जुलै-२०२४ पासून सुरू केलेली 'मुख्यमंत्री-माझी लाडकी...

पोलीस भरतीत पात्र ठरलेले युवक-युवतीचा कुरखेडा मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने सत्कार..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीत कुरखेडा शहराच्या मुस्लिम समाजातील एक युवक व एक युवती पात्र ठरले आहे.प्रथमच शहरातील मुस्लिम समाजाची युवक-युवती पोलीस दलात दाखल...

बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; यंदाही मुलींनीच मारली बाजी..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या फेब्रुवारी- मार्च-२०२६ बारावी परीक्षेचा निकाल आज,शनिवार २ मे जाहीर करण्यात...

येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या नावात आईचे नाव अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-आईच्या योगदानाला विशेष सन्मान देण्यासाठी,लिंग समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सामाजिक समतोल राखण्यासाठी आता महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या ओळखीच्या पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!