Monday, September 21, 2026
Homeनवी दिल्लीमोठी बातमी.. तब्बल २५ ॲप्ससह वेबसाइट्सवर केंद्र सरकारने घातली बंदी.. - उल्लू...

मोठी बातमी.. तब्बल २५ ॲप्ससह वेबसाइट्सवर केंद्र सरकारने घातली बंदी.. – उल्लू ॲप्ससह विविध प्लॅटफॉर्मचा समावेश..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नवी दिल्ली :-केंद्र सरकारने भारतामध्ये कोरोना कालावधीत पॉर्न वेबसाईटवर बंदी आणल्यानंतर विविध कंपन्यांनी सॉफ्ट पॉर्न कंटेंट दाखविण्यास सुरुवात केली होती.यात उल्लू ॲप आणि एएलटीटी सारख्या ॲप्सनी धुमाकूळ घातला होता.हे सर्व प्लॅटफॉर्म आय टी (IT) नियमांचे उल्लंघन करत असल्याचे आढळून आले होते.हे प्लॅटफॉर्म नियमांचे उल्लंघन करून अश्लील आणि आक्षेपार्ह सामग्री प्रसारित करत होते.तरुण वर्गासह सर्वच वयोगटाला या ॲप्सनी चांगलीच भुरळ घातली होती.यामुळे तरुण पिढी देखील बिघडत चालली होती. यावर आवर  घालावे कसे? असा प्रश्न केंद्र सरकार पुढे होता.अश्यातच आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत इंटरनेट सेवा प्रदात्यांना देशभरात अशा प्रकारची सामग्री दाखवणाऱ्या तब्बल २५ ॲप्ससह वेबसाइट तात्काळ ब्लॉक करण्याचे निर्देश दिले आहेत.यात उल्लू, एएलटीटी,बिग शॉट्स ॲप,डेसिफ्लिक्स,बूमेक्स, नवरासा लाईट,गुलाब ॲप,कंगन ॲप,बुल ॲप,जलवा ॲप,वॉव एंटरटेनमेंट,लूक एंटरटेनमेंट हिटप्राइम,फेनिओ,शोएक्स, सोल टॉकीज,अड्डा टीव्ही,हॉटएक्स व्हीआयपी,हलचल ॲप, मूडएक्स,निऑनएक्स व्हीआयपी,फुगी, मोजफ्लिक्स,ट्रायफ्लिक्स या सॉफ्ट पॉर्न दाखविणाऱ्या प्लॅटफॉर्मवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे.यासाठी केंद्र सरकारने माहिती तंत्रज्ञान कायदा,२००० च्या कलम ७९ (३)(ब) व IT नियम,२०२१ च्या नियम ३(१) (ड) नुसार कारवाई केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दत्तक प्रक्रियेत चार बालकांना मिळाले कायदेशीर पालकत्व..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-बाल न्याय(मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम,२०१५ व सुधारित अधिनियम,२०२१ मधील तरतुदींनुसार गडचिरोली जिल्ह्यातील दत्तक प्रक्रियेची चार प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत....

पठ्ठ्याने दिमाक लावला खरी,पण अलगद खाकीच्या जाळ्यात अडकला.. -दारूसाठ्यासह २८ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-चोर कितीही शातिर असला तरीही तो खाकीच्या नजरेतून सुटूच शकत नाही.काही घटना यांस अपवाद असू शकतात.पण,एखाद्या चित्रपटातील स्टाईल ही प्रत्यक्षात खरी...

२२ मिनी सेतू केंद्रचालकांची भरती प्रक्रिया; अंतिम पात्र-अपात्र यादी प्रसिद्ध..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील १३ ‘दादालोरा खिडकी’ आणि ९ ‘आदी सेवा केंद्र’ अशा एकूण २२ केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय व लोकाभिमुख सेवा पुरविण्यासाठी...

राज्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या हालचालींना वेग..

उद्रेक न्युज वृत्त :-यंदा पावसाने दडी मारल्याने महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती उद्भवलेली आहे.अस्मानी संकटामुळे शेतकरी बांधव हवालदिल झाला आहे.राज्यात पावसाने घेतलेली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!