Friday, September 11, 2026
Homeगडचिरोलीशंभर टक्के अनुदानावर; फळबाग लागवडीसह बांबू लागवड व पुष्पोत्पादन योजना.. -...

शंभर टक्के अनुदानावर; फळबाग लागवडीसह बांबू लागवड व पुष्पोत्पादन योजना.. – कृषी विभागातर्फे जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यामध्ये फळबाग लागवडीसाठी अत्यंत पोषक वातावरण असून याचा फायदा घेण्यासाठी कृषी विभागाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने(MGNREGS) अंतर्गत जॉब कार्ड धारक शेतकऱ्यांना शेत बांधावर,पडीक तसेच शेतजमिनीवर फळबाग लागवड,बांबू लागवड आणि पुष्पोत्पादनासाठी जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी या योजनेकरिता अर्ज करून लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांनी केले आहे.
  •  शंभर टक्के अनुदान👇
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत(MGNREGS)फळबाग लागवडीसाठी शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदान दिले जाते.ही योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर असून, यामध्ये रोपे खरेदी,खड्डे खोदणे,लागवड करणे,खत व्यवस्थापन आणि महत्त्वाचे म्हणजे तीन वर्षांपर्यंत रोपांची निगा राखणे यांसारख्या कामांचा समावेश आहे.या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याकडे केवळ जॉब कार्ड असणे आवश्यक आहे.
  • कोण ठरणार पात्र👇
या योजनेसाठी विविध समाज घटकातील शेतकरी पात्र ठरतील.यामध्ये खालील प्रमुख गटांचा समावेश आहे
अनुसूचित जाती (SC)
अनुसूचित जमाती (ST)
भटक्या जमाती (NT)
निरधिसूचित जमाती (विमुक्त जमाती – De-notified Tribes)
दारिद्र्य रेषेखालील इतर कुटुंबे
स्त्री कुटुंबप्रमुख असलेली कुटुंबे
दिव्यांग व्यक्ती कुटुंबप्रमुख असलेली कुटुंबे
जमीन सुधारणांचे लाभार्थी
प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण योजनेखालील लाभार्थी
अनुसूचित जमातीचे व इतर पारंपरिक वनवासी (वन हक्क मान्य करणे)अधिनियम, २००६ (२००७ चा २) खालील पात्र लाभार्थी
सीमान्त व लहान शेतकरी
  • गडचिरोलीत वाढती पसंती आणि दर्जेदार कलमांची उपलब्धता👇
गडचिरोली जिल्ह्यात आंबा,काजू,चिकू,फणस या पिकांसाठी लाभार्थ्यांची पसंती सातत्याने वाढत आहे. या पिकांच्या लागवडीमुळे शेतकऱ्यांना चांगला आर्थिक लाभ मिळू शकतो,यासाठी कृषी विभागामार्फत प्रचार,प्रसिद्धी आणि मार्गदर्शन केले जात आहे.’हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र’ अभियानांतर्गत उच्च दर्जाची फळपिके लावण्यासाठी, शासकीय दरात उच्च दर्जाची कलमे सोनापूर,वाकडी (गडचिरोली),कृष्णनगर (चामोर्शी),कसनसुर (एटापल्ली) व रामगड (कुरखेडा) येथील शासकीय फळरोपवाटिकांमध्ये उपलब्ध आहेत.
  • अर्ज कसा आणि कुठे करावा?👇
जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी आपल्या ग्राम पंचायत कार्यालय,ग्राम रोजगार सेवक अथवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.योजनेत सहभागी होण्यासाठी अर्ज विनामूल्य उपलब्ध आहेत.जास्तीत- जास्त पात्र शेतकऱ्यांनी फळबाग,बांबू तसेच पुष्पोत्पादन पिकांच्या लागवडीस सहभाग घेऊन आपल्या शेतीत फळबाग लागवडीच्या माध्यमातून समृद्धी आणावी,असे कृषी विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धरणात बुडालेल्या तरुण शेतकऱ्याचा सापडला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बैल पोळा सणाच्या एक दिवसापूर्वी धरण परिसरात बैल धुण्यासाठी गेलेला तरुण शेतकरी बुडाल्याची घटना काल,बुधवार ९ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजेच्या...

सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन,वारसा हक्क,पदोन्नती व निवासाच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करा- राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागरिकांचे आरोग्य आणि सार्वजनिक स्वच्छता राखण्यात सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.त्यामुळे त्यांच्या वेतन,सेवा,आरोग्य, निवास व आर्थिक सुरक्षिततेशी संबंधित प्रलंबित प्रश्नांचा...

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत विद्यार्थ्यांमध्ये उत्तम मूल्यसंस्कार रुजविणे काळाची गरज-शिक्षणमंत्री दादाजी भुसे – ‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत आज विविध शाळांना प्रत्यक्ष भेटी.. – पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शाळेत केवळ पुस्तकी ज्ञान देणे पुरेसे नसून गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच भावी पिढीवर राष्ट्रभक्तीचे आणि उत्तम मूल्यांचे संस्कार रुजवणे गरजेचे आहे.गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातही...

अजब लाचेची गजब कहाणी..! दोन्ही हातांच्या दहा बोटांचा इशारा करून मागितली १० हजाराची लाच.. – पोलीस उपनिरीक्षक व पोलीस अंमलदार एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  छत्रपती संभाजीनगर :-राज्याच्या विविध भागात सरळ-सरळ तोंडी बोलणी करून अनेकजण लाच घेतांना व एसीबीच्या जाळ्यात अडकतांना दिसून येतात.पण, नुकतेच छत्रपती संभाजीनगर(पूर्वीचे औरंगाबाद)शहरात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!