Saturday, September 12, 2026
Homeदेसाईगंजमोठी बातमी ऐन संक्रातीच्या दिवशी वाघाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी... - जुनी...

मोठी बातमी ऐन संक्रातीच्या दिवशी वाघाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी… – जुनी वडसा शेतशिवारातील आज सकाळची घटना..! पहा वाघाचा व्हिडिओ

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगरपरिषदे अंतर्गत येणाऱ्या जुनी वडसा येथील शेतकऱ्यास ऐन मकरसंक्रांती सणाच्या दिवशी म्हणजेच आज,मंगळवारी १४ जानेवारीला सकाळी ९ ते ९.३० वाजेच्या दरम्यान वाघाने हल्ला चढविल्याची घटना जुनी वडसा येथील शेतशिवारात घडली.गणपत केशव नखाते वय ४६ वर्षे, रा.जुनी वडसा, ता.देसाईगंज असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार,शेतकरी गणपत नखाते हे आज सकाळच्या सुमारास नेहमी प्रमाणे गावापासून एक किलोमिटर अंतरावर असलेल्या आपल्या शेतावर गेले होते.अशातच शेतावर कामे करीत असतांना गणपत यांचेवर अचानकपणे भल्या मोठ्या वाघाने मागेहून  हल्ला चढवला.हल्ला चढवताच त्यांनी आरडा ओरड केली.आरडा ओरड करताच परिसरातील शेतकरी तसेच मकरसंक्रांती सणा निमित्त नदी तीरावर जाणाऱ्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.घटनास्थळी मोठ्या संख्येने नागरिक गोळा झाल्याने वाघाने जुनी वडसा शेतशिवारातून कुरुड गाव परिसराकडे धूम ठोकली. घटनास्थळावर काहीकाळ बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. जखमी शेतकऱ्यास नागरिकांनी तात्काळ देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.वाघाने मागेहून हल्ला चढवत गणपत नखाते यांच्या पाठी मागील खालील भागावर पंजा मारून जखमी केले आहे.सदर घटनेची माहिती देसाईगंज वन विभागास देण्यात आली.त्यानुसार वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी धोंडणे,वनक्षेत्र सहाय्यक के.वाय.कऱ्हाडे सह वन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांचेकडून वाघावर पाळत ठेवण्यात येत आहे.
ऐन मकरसंक्राती सणाच्या दिवशीच वाघाने हल्ला चढवून शेतकऱ्यास जखमी केल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत.वाघाचा बंदोबस्त करून जखमी शेतकऱ्यास वन विभागाने तात्काळ आर्थिक मदत द्यावी; अशी मागणी केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नोकरीचे खोटे नियुक्तीपत्र दाखवून दोन महिलांची फसवणूक; दोघांवर गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-मंत्रालयात चांगली ओळख असल्याची बतावणी करून सरकारी रुग्णालयात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत दोन महिलांची तब्बल १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा...

आता ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार विस्तार अधिकाऱ्यांकडे; विस्तार अधिकारी बनले प्रशासक..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सुरळीत...

नैनपूरच्या महात्मा गांधी शाळेत तान्हा पोळ्याचा अनोखा सोहळा; विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने जिंकली उपस्थितांची मने..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षणासोबत संस्कार, संस्कृतीसोबत सामाजिक जाणीव आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड,देसाईगंज येथे आज,शुक्रवार ११...

बापरे..! तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून फिल्मी स्टाईलने पळवली रोकड.. – बँक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात फेकली मिरची पूड; व्हिडिओ व्हायरल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २८ वर्षीय तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत प्रवेश करून आव-डाव पाहिला अन् बँकेतील उपस्थित कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात लाल मिरचीची पूड...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!