Wednesday, June 10, 2026
Homeगोंदियाअनधिकृतरीत्या वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या टिप्परचा परवाना होणार रद्द...

अनधिकृतरीत्या वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या टिप्परचा परवाना होणार रद्द…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-अनधिकृतरीत्या वाळू उपसा करून त्याची वाहतूक करणाऱ्या टिप्परचा परवाना रद्द केला जाणार असून,आरटीओ दंड आकारणार आहे.उपप्रादेशिक परिवहन विभागाला या संबंधीच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत.प्रतिवाहनाच्या प्रतिफेरीसाठी तब्बल ४० हजार रुपये वसूल केले जाण्याची शक्यता आहे. तसेच संबंधित वाहनाचे परमिटसुद्धा रद्द केले जाणार आहे.
मागील वर्षभराचे रेकॉर्ड काढून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्पर मालकांना नोटिसा पाठविण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.नोटीस मिळाल्यापासून तीन दिवसांच्या आता आपले म्हणणे सादर करण्याचे संबंधितांना आदेशित केले जाते. म्हणणे सादर केले नाही तर त्यांचे काहीच म्हणणे नाही; असे गृहीत धरून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.
टिप्परने किती वेळा चकरा मारल्या त्यावरून दंडाची आकारणी केली जाणार आहे.टिप्परमध्ये क्षमतेपेक्षा जास्त वाळू वाहून नेल्याचे दिसून आल्यास प्रतिफेरीसाठी जवळपास ४० हजार रुपये दंड आकारला जाईल.उदा.एखाद्या टिप्परने वर्षभरात वाळूच्या १०० फेऱ्या मारल्या असतील तर त्यास ४० लाख रुपये दंड आकारला जाईल.शिवाय त्याचे परमिटसुद्धा रद्द करण्याची कार्यवाही केली जाणार आहे.
टिप्पर मालकांनी त्यांच्या वाहनाचा विमा काढलेला आहे.संबंधित वाहन हे अवैध कार्यवाहीसाठी वापरले असल्यामुळे आपल्याकडून निर्गमित केलेली विमा पॉलिसी रद्द करावी; असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित वाहनाचा विमा काढणाऱ्या विमा कंपनीला दिले आहेत.त्यामुळे त्या टिप्परची विमा पॉलिसीसुद्धा रद्द होणार आहे.
आदेशात काय म्हटले?
टिप्परमध्ये वाहनाच्या क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक झालेल्या सर्व घटनांमध्ये वेगवेगळे दंड आकारण्याची कार्यवाही मोटार वाहन अधिनियमानुसार करण्यात यावी.वसुली करतांना वाहन जप्तीची कार्यवाही करावी. तसेच संबंधित वाहन गुन्हेगारी कामांसाठी वापरले असल्याने त्याचे परमिट तत्काळ रद्द करावे, अशी सूचना केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दुर्गम गडचिरोलीतील तब्बल ७८ विद्यार्थ्यांना देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुर्गम,नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात आलेला ‘मिशन-२००’ हा उपक्रम...

अखेर नदीत बुडालेल्या तीन तरुणांचे सापडले मृतदेह; उर्वरित दोन युवकांचा शोध सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या घुग्गुस शहरातील पाच तरुण म्हातारदेवी परिसरातील वर्धा नदीवर पोहण्यासाठी गेले असता काल सोमवारच्या रात्री उशिरापर्यंत घरी परतले नसल्याने नदीत बुडाल्याची भीती...

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना झटका.. आता नऊ सिलेंडरवर नाही; तर चारच सिलेंडरवर मिळणार अनुदान..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या दरात रविवार ७ जून २०२६ पासून २९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.त्यानुसार, बऱ्याचश्या जिल्ह्यांमध्ये गॅस सिलेंडरच्या किंमतींनी...

कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी आधार पडताळणी करणे आवश्यक..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील अनेक शेतकरी गेल्या काही वर्षापासून नैसर्गिक आपत्ती,अवकाळी पाऊस, उत्पादन खर्चातील वाढ आणि शेतमालाला न मिळणारा योग्य भाव,यामुळे आर्थिक संकटाचा सामना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!