Wednesday, March 11, 2026
Homeचंद्रपूरमुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेतंर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील ८०० भाविक 'अयोध्या' करीता रवाना..

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेतंर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील ८०० भाविक ‘अयोध्या’ करीता रवाना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-राज्यातील सर्व धर्मीयांमधील ६० वर्ष व त्यावरील जेष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्री जाण्याची सुप्त इच्छा असते,परंतु गोरगरीब,सर्वसामान्य कुटुंबातील जेष्ठ नागरिक त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे आणि पुरेशी माहिती नसल्याने तीर्थक्षेत्राच्या दर्शनाला जाऊ शकत नाही.ही बाब विचारात घेऊन सर्वसामान्य जेष्ठ नागरिकांना देशातील मोठ्या तीर्थस्थळी जाऊन मनःशांती तसेच अध्यात्मिकतेचे दर्शन व्हावे,यासाठी राज्य आणि भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची दर्शनाची संधी देण्यासाठी ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ सुरू करण्यात आली आहे.त्या अनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण ८०० भाविक लाभार्थी श्रीराम मंदिर (अयोध्या) करिता पात्र करण्यात आले.१९ ते २३ मार्च या कालावधीत सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सदर यात्रा पार पडणार आहे.आज,बुधवार १९ मार्च रोजी चंद्रपूर रेल्वे स्थानाकावरुन यात्रेकरूंना घेऊन सदर रेल्वे २० मार्च रोजी श्रीराम मंदीर अयोध्या येथे पाहोचणार आहे.२१ मार्च रोजी सांयकाळी अयोध्या रेल्वे स्थानकावरुन निघून २३ मार्च रोजी चंद्रपूर येथे पोहोचणार आहे.भाविकांना शुभेच्छा देतांना जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.म्हणाले की,मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातून आज ८०० लोक अयोध्येला रवाना होत आहेत.भाविकांसाठी ही शासनाची महत्वाकांक्षी योजना असून जिल्ह्यातील नागरिकांना रामलल्लाच्या दर्शनाची संधी मिळाली आहे.
यावेळी पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, उपविभागीय अधिकारी संजय पवार,नागपूर येथील सामाजिक न्याय विभागाचे उपायुक्त सिध्दार्थ गायकवाड, सहाय्यक आयुक्त (समाजकल्याण) विनोद मोहतुरे,तहसीलदार विजय पवार, समाजकल्याण विभागाचे दीपक धात्रक, स्मिता बैरमवार,सचिन फुलझेले आदी उपस्थित होते.तत्पुर्वी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने चंद्रपूर रेल्वे स्थानकावर प्रवाशांना ओळखपत्र देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.गत महिन्यात ५ ते ९ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत बौध्दगया येथे तीर्थदर्शनाचे नियोजन करण्यात आले होते.यात जिल्ह्यातील २०३ पात्र लाभार्थ्यांनी महाबोधी मंदीर (बौद्धगया) येथे दर्शन घेतले होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता वाहनचालकांशी उद्धटपणे वागणे आणि दंड भरण्यासाठी सक्ती करणे पोलिसांना पडणार महागात..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यात प्रलंबित ई-चालान वसुलीसाठी वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे.मात्र,या मोहिमेदरम्यान अनेक ठिकाणी पोलीस वाहनचालकांना रस्त्यात अडवून 'दंड आत्ताच भरा,अन्यथा...

सरपण गोळा करण्यासाठी जंगल परिसरात गेलेल्या इसमावर वाघाचा हल्ला; इसम ठार..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जंगल परिसरात सरपण गोळा करीत असतांना वाघाने हल्ला चढवून एका इसमास ठार केल्याची घटना काल मंगळवारी सायंकाळच्या सुमारास ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील...

ऐतिहासिक यश; नैनपूरच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळेस ‘आयएसओ’ मानांकन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा नैनपूर या शाळेला आज,बुधवार ११ मार्च रोजी ISO 9001:2015 Quality...

शिक्षकाचे पाच विद्यार्थिनींशी अश्लील चाळे; पालकांनी चपलेने बदडले..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यात शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना आज,मंगळवार १० मार्च रोजी उघडकीस आली आहे.एका ५४ वर्षीय शिक्षकाने इयत्ता चौथीच्या पाच विद्यार्थिनींशी अश्लील...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!