Thursday, September 3, 2026
Homeनागपूरअखेर नागपूर शहरातील हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाईंड गवसला.. - पोलीस तपासात धक्कादायक माहिती...

अखेर नागपूर शहरातील हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाईंड गवसला.. – पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-नागपूर शहरात सोमवारी १७ मार्च रोजी उसळलेल्या हिंसाचार प्रकरणात एफआयआरच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी नोंदवलेल्या गुन्ह्यात मायनॉरिटी डेमॉक्रॅटीक पार्टीचा शहराध्यक्ष फहीम शमीम खान याने जमाव गोळा केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.विशेष म्हणजे,हाच फहीम खान हिंसाचाराच्या काही तास आधी पोलिस स्टेशनमध्ये निवेदन देण्यासाठी गेला होता.३८ वर्षीय फहीम खान हा मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा शहराध्यक्ष असून,त्याने २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती.
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार,या हिंसाचाराचे पूर्वनियोजित कटकारस्थान रचण्यात आले होते.यात इतर अनेक संशयितांचीही भूमिका असण्याची शक्यता आहे.आश्चर्यकारक बाब म्हणजे, हिंसाचारानंतरही फहीम खानचे नाव थेट आरोपपत्रात नव्हते.मात्र,तपास पुढे जाताच त्याची संलग्नता स्पष्ट झाली.सोमवारी,विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने औरंगजेबाच्या कबरीविरोधात आंदोलन केले होते. यानंतर फहीम खानने आपल्या ४० ते ५० समर्थकांना एकत्रित करून गणेशपेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी हजेरी लावली होती.त्यांनी आंदोलनादरम्यान चादर जाळल्याचा आरोप करत कारवाईची मागणी केली होती.मात्र,रोजा सुरू असल्याने संध्याकाळी ही गर्दी पांगली.रात्री ८ वाजताच्या सुमारास महाल परिसरात अचानक मोठ्या प्रमाणावर हिंसाचार उफाळून आला.पोलिसांच्या माहितीनुसार,फहीम खानच्या नेतृत्वाखाली जमावाने दोन तासांहून अधिक काळ दंगल घडवली.या काळात सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले,तसेच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरनुसार,फहीम खान याने मोठ्या प्रमाणात लोकांना एकत्र आणून आंदोलन छेडण्याचे काम केले.त्यानंतर जमाव आक्रमक झाला आणि त्याने सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्यास सुरुवात केली.हिंसाचारादरम्यान अनेक वाहने फोडण्यात आली,तसेच काहींना जाळण्याचाही प्रयत्न करण्यात आला.
पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत हेही समोर आले आहे की,फहीम खानने पोलिस स्टेशनमध्ये जाऊन एका मागणीसाठी निवेदन दिले होते.मात्र,त्यानंतर त्याने आपल्या समर्थकांना भडकवले आणि मोठ्या प्रमाणावर जमाव गोळा करण्याचे नियोजन केले, असा आरोप एफआयआरमध्ये करण्यात आला आहे.
पोलिस तपास आणि पुढील कारवाई
या प्रकरणी पोलिसांनी कठोर कारवाई सुरू केली आहे.आतापर्यंत ६५ जणांवर नामजद गुन्हा दाखल करण्यात आला असून,६०० अज्ञात व्यक्तींवरही आरोप ठेवण्यात आले आहेत.पोलिसांनी अनेक आरोपींना अटक करून त्यांना न्यायालयात हजर केले असून,त्यातील ४६ जणांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.११ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अजूनही संचारबंदी लागू आहे.नागपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,परिस्थिती नियंत्रणात असली तरी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे.पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की,परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतरच टप्प्याटप्प्याने संचारबंदी शिथिल केली जाईल.नागपूर पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.सोशल मीडियावर हिंसाचाराशी संबंधित चुकीची माहिती पसरवू नये,असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या अनुचित प्रकारांवर पोलिस बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम गहाणे यांना आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर.. -उच्च शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील महाविद्यालयीन,विद्यापीठ, अभियांत्रिकी व कला शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या प्राचार्य व शिक्षकांचा यथोचित गौरव करण्याच्या उद्देशाने दरवर्षी “डॉ.जे.पी.नाईक आदर्श...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!