Saturday, June 20, 2026
Homeचंद्रपूरमालवाहू ट्रकची उभ्या ट्रकला धडक; मजुराचा मृत्यू तर एकजण जखमी..

मालवाहू ट्रकची उभ्या ट्रकला धडक; मजुराचा मृत्यू तर एकजण जखमी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-एका मालवाहू ट्रकने रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला जोराची धडक दिल्याने उभा असलेला ट्रक काही अंतरावर सरकून जवळच असलेल्या मार्केटमध्ये घुसल्याने मार्केटमध्ये काम करणाऱ्या मजुराचा मृत्यू झाला तर चालक गंभीर जखमी झाल्याची घटना आज,बुधवारी १५ जानेवारीच्या सकाळी सहाच्या सुमारास नागपूर- चंद्रपूर महामार्गावरील नागभीड तालुक्यातील तळोधी (बा.)शहरातील शिवाजी चौकाजवळ घडली.माधव नामदेव मांढरे वय ३५ वर्षे,रा.तळोधी (बा.),ता.नागभीड,जि.चंद्रपूर असे मृत मजुराचे नाव आहे.
माहितीनुसार,नागपूर येथून एमएच ४० वाय २९९० क्रमांकाचा ट्रक मूल येथे तांदूळ घेऊन निघाला होता.सकाळी ६ वाजेच्या सुमारास नागपूर चंद्रपूर मार्गावरील नागभीड तालुक्यातील तळोधी (बा.)येथे शिवाजी चौकाजवळ कबाडी सामान भरलेला ट्रक उभा होता.तर तिथेच जवळ अन्य एक खाली ट्रक उभा होता.तांदूळ घेऊन जाणाऱ्या ट्रकने कबाडी सामान भरलेल्या एम एच ३२ क्यू ५३७४ क्रमांकाच्या ट्रकला जोराची धडक दिली.त्यामुळे ट्रकमधील तांदळाचे कट्टे रस्त्यावर अस्ताव्यस्त पडले.तर धडकेमुळे उभा असलेला ट्रक ५० मीटर पर्यंत मागे सरकल्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेला किशोर कटारे यांच्या मटण दुकानावर जाऊन आदळला.
या दुकानावर काम करणारा माधव मांढरे याला जबर धडक बसली.यामध्ये तो गंभीर जखमी झाला.घटनेची माहिती मिळताच तळोधी पोलिसांनी चंद्रपूर येथे खाजगी रुग्णालयात जखमींना हलविले. उपचारादरम्यान माधव मांढरे याचे निधन झाले. याबाबत ट्रक चालक रामेश्वर टेकचंद ठाकरे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर चालकही जखमी झाला आहे.त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तीन तिघडा अन् काम बिघडा..! वन परिक्षेत्र अधिकारी,वनरक्षक व खाजगी इसम एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त गडचिरोली :-अनेकांना वाटतेय की,एखाद्या तिसऱ्याच व्यक्तींच्या माध्यमातून पैश्याची रक्कम घेतली,तर आपले नाव वा आपली करणी उजेडात येणार नाही.पण,लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तसला...

गडचिरोली जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांमुळे लक्षणीय पाणीसाठा निर्माण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात मागील दोन वर्षांत विविध योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत.या कामांमुळे जिल्ह्यात लक्षणीय पाणीसाठा निर्माण झाला असून...

आता भाडेपट्ट्यावरील शासकीय जमिनींच्या अधिकार अभिलेखात असणार ‘महाराष्ट्र शासन’ कब्जेदार..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील भाडेपट्ट्याने प्रदान करण्यात आलेल्या शासकीय जमिनींच्या अधिकार अभिलेखातील नोंदी अधिक अचूक,पारदर्शक आणि एकसमान करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.मुख्यमंत्री...

वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागभीड तालुक्यातील गिरगाव येथे आज,शुक्रवार १९ जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.आत्माराम दसरू बोरकर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!