उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर : – शहरातील औद्योगिक वसाहतीतील भारतीय स्टेट बँकेची शाखा फोडून १४ लाख रूपये पळवून नेल्याची घटना आज सोमवारी २० फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे.शनिवार व रविवारला बँकेला सुटी असल्याने याच कालावधीत बँक फोडल्याचा अंदाज नागरिकांतून वर्तविण्यात येत आहे.या घटनेने चंद्रपूरातील बँकेतील सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
घुग्गुस- चंद्रपूर मार्गावरील औद्योगिक वसाहतीत (एमआयडीसी) मध्ये भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा आहे.पडोली पोलिस ठाण्याचे अंतर्गत ही शाखा येते.शनिवार व रविवार अशा सलग दोन दिवस सुटी असल्याने बँक बंद होती.याच संधीचा फायदा अज्ञात चोरट्यांनी बँक फोडून बँकेच्या लॉकरमधील १४ लाखांची रोकड पळविली.सोमवारी सकाळी बँक उघडल्यानंतर बँकेत चोरी झाल्याची घटना उघडकीस आली.
तत्काळ घटनेची माहिती पडोली पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेला देण्यात आल्याने दोन्ही शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धाव घेवून घटनेची पहाणी केली. सर्वप्रथम बँकेतील सीसीटीव्हीचे फुटेज ताब्यात घेऊन पोलिसांनी तपासाला सुरूवात केली आहे.या घटनेनंतर औद्योगिक वसाहतीत भीतीचे वातावरण पसरले आहे.
पोलीस निरीक्षक सुनीलसिंग पवार हे पडोली पोलिस ठाण्यात नव्याने रुजू होऊन नुकताच ठाण्यातील त्यांनी पदभार स्विकारला आहे.याचदरम्यान चोरट्यांनी बँकेत मोठी चोरी केल्याने अज्ञात आरोपींना शोधण्याचे मोठे आवाहन त्यांच्या समोर आहे.सदर घटनेमुळे बँकेत खळबळ उडाली असुन सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.