Tuesday, November 11, 2025
Homeआरमोरीभाकप‌ ची देशव्यापी जनजागरण मोहीम....भाजप हटाव-देश बचाव; भाजप हटाव-महाराष्टू बचाव....

भाकप‌ ची देशव्यापी जनजागरण मोहीम….भाजप हटाव-देश बचाव; भाजप हटाव-महाराष्टू बचाव….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

चुन्नीलाल मोटघरे

आरमोरी :- भारतीय कम्युनिस्ट पक्ष महाराष्ट्र राज्य कौन्सिलच्या वतीने १४ अप्रिल‌ ते १५ मे २०२३ पासून भाजप हटाव-देश बचाव,भाजप हटाव महाराष्ट्र बचाव देशव्यापी जनजागरण मोहीम भाकप गडचिरोली जिल्हा कौन्सिलचे वतीने आज १८ एप्रिल ला आरमोरीत क्रांतिकारक शहीद भगतसिंग चौकात शहीद भगतसिंग यांचे फोटो ला‌ माल्यार्पन‌ व अभिवादन करून सुरू करण्यात आली.तसेच महात्मा ज्योतिबा फुले चौकातील ज्योतिबा फुले यांचे पुतळ्यास,गुजरी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास,व तथागत विचारातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

देशात ९ वर्षांपासून सत्तेवर असलेल्या भाजपप्रणित नरेंद्र मोदी सरकारच्या धोरण व कार्यपद्धतीमुळे देशातील सर्वसामान्य जनता महागाई, बेरोजगारी आणि विषमतेच्या खाईत लोटली जात आहे.कष्टकरी जनतेच्या हालअपेष्टांना पारावर उरलेला नाही. मध्यमवर्गाचे जिवन देखील असुरक्षित बनले आहे.एवढेच नव्हे,तर देशाची अर्थव्यवस्था पार रसातळाला चालली आहे.यातून निर्माण होणारा असंतोष दडपून टाकण्यासाठी देशातील कामगार, शेतकऱ्यांच्या आंदोलनावर दडपशाही करने  नित्याचेच झाले आहे.विविध तपास यंत्रणांना वापर करून विरोधी पक्षातील नेत्यांना नामोहरम करणे, त्यांनां जेलमध्ये डांबून टाकण्याचे प्रकार सर्रासपणे सुरू आहेत.विरोधी‌ पक्षातील खासदारांचे सदस्यत्व रद्द करण्याच्या टोकाच्या घटनादेखिल घडत आहेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील व्यक्तींची राज्यपाल म्हणून नेमणूका करत १२ राज्यांमधील पक्ष फोडून, अनेक ठिकाणी सत्तेवर कब्जा मिळविण्याचे कारस्थान केंद्रातील भाजपा सरकारच्यावतीने करण्यात आले आहे.महाराष्टू राज्यात पदावर राहिलेल्या राज्यपालाने नेहमीच छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा फुले,सावित्रीबाई फुले या महापुरुषांची वेळोवेळी हेतुपुरस्सर बदनामी केल्या आहेत.

सर्व जाती धर्माचे व प़ंथाच्या नागरिकांना विकासाची समान संधी देण्याच्या व विचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य देण्याच्या भारतीय राज्यघटनेच्या मुळ गाभ्यावरच प्रहार करणारे कायदे करून, भारतीय नागरिकांचे‌ जिवन अस्थिर करण्याची पावले भाजप राजवटीने‌ सातत्याने उचलली  आहेत.ज्या महाराष्ट्राने भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात मोठी भागीदारी केली.जिथे क्रांतिकारी आणि सत्याग्रही जनतेने आयुष्य पणाला लावून इंग्रजांच्या गुलामगिरी विरुद्ध लढा दिला.जिथे आता मुळभर भांडवलदारांच्या हितसंबंधी साठी लोकशाहीची गळचेपी करून,व्देषावर आधारित हुकूमशाही थांबविण्याचा प्रयत्न सत्ताधारी भाजप करीत आहे.म्हणूनच स्वस्थ बसून चालणार नाही.हुकूमशाहिविरुध्द लोकलढा लढावा लागणार आहे.पुरोगामी परंपरा असणाऱ्या, मराठी बाणा जोपासणाऱ्या आणि छञपती शिवराय,संत नामदेव ,संत तुकाराम, हुतात्मा राजगुरू यांच्या भूमीवर हा सत्तालोलुप नंगानाच आपण किती दिवस चालू देणार? महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज, आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा असलेल्या भूमीवर विषमता आणि भेदभाव यांचा उतमात कसा चालू द्यायचा ?

म्हणूनच नव्या परिवर्तनवादी लोकचळवळीसाठी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी,कामगारांच्या न्यायासाठी , मजुरांच्या जगण्यासाठी,बेरोजगारांच्या भवितव्यासाठी,महिलांच्या लोकशाहीसाठी,हक्क आणि अधिकाराच्या नव्या राजकारणासाठी व पेट्रोल डिझेल गॅस च्या किंमती कमी करण्यासाठी,वाढते विद्युत कमी करुण नौकरी संदर्भातील ज्या ९ एजन्सी कडे देण्यात आलेले‌ आहे. त्या त्वरित बंद करुन पूर्वता शासनाच्या वतीने भरण्यात यावे.’भाजप हटाव-देश बचाव’ या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या देशव्यापी जनजागरण मोहिमेत मोठ्या संख्येने सक्रियपणे सहभागी होण्याचे‌ आवाहन डॉ.महेश कोपूलवार राज्य कार्यकारिणी सदस्य भाकप,काॅ.देवराव चवळे जिल्हा सचिव गडचिरोली,ॲड.जगदिश मेश्राम जिल्हा सहसचिव गडचिरोली,काॅ.संजय वाकडे तालुका सचिव आरमोरी,काॅ.प्रकाश‌ ठलाल तालुका सचिव कुरखेडा,काॅ.राजीराम उईके तालुका सचिव कोरची,काॅ‌.सचिन‌‌ मोतकुरवार तालुका सचिव एटापल्ली,काॅग्रेसचे तेजस मडावी ऋषी रामटेके ,काॅ.हिरालाल येरमे,चंद्रभान मेश्राम,मिनाक्षी सेलोकर, सिंधू कापकर,शालू इंदूरकर, प्रकाश खोब्रागडे,प्रशात खोब्रागडे,जलील पठाण,अविनाश चहांदे ,केवळराम नागोसे,मारोतराव नरुले,मनोज दामले, सुरेश सोनटक्के,डंबाजी नरुले,शरीफ शेख,सुरज जक्कुलवार, किशोर मनकापुरे,संजय आञाम,तुलाराम नेवारे,प्रभाकर झिलपे,परसराम आदे इत्यादी रॅलीत सहभागी होऊन संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातील गावागावात फिरून भाजप च्या चुकीच्या धोरणाविरोधात जनजागरण करीत आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

व्यवहार न झालेल्या निष्क्रिय बँक खात्यांमध्ये ३९ कोटींपेक्षा जास्त रक्कम पडून.. – ३१ डिसेंबरपर्यंत दावा करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गेल्या १० वर्षांपासून व्यवहार न झालेल्या निष्क्रिय बँक खात्यांमधील ठेवी रकमेचा लाभ आता पुन्हा खातेदारांना मिळू शकतो.भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार अशा...

देसाईगंज नगराध्यक्ष पदासाठी वनिता नाकतोडेंचे नाव फ्रंट पेजवर..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज (गडचिरोली):-नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुक प्रक्रियेचा कार्यक्रम जाहीर होताच अनेकजण मैदानात उतरल्याचे दिसून येत आहे. दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या...

अल्पवयीन मुलास अश्लील व्हिडिओ दाखवणाऱ्यास बेड्या..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बऱ्याच कालावधीपासून एका अल्पवयीन मुलास अश्लील(पॉर्न)व्हिडिओ दाखवणाऱ्या ३० वर्षीय इसमास पालकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.प्रकरणी बाललैंगिक अत्याचार कायदा व पॉक्सो कायद्याच्या...

शेतीसाठी तारेची कुंपण योजना; ८५ टक्क्यापर्यंत अनुदान..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांच्या पिकांचे वन्य प्राणी आणि मोकाट जनावरांपासून संरक्षण करण्यासाठी तसेच रब्बी हंगामातील लागवड क्षेत्र वाढविण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद कृषी विभागाने “शेतीसाठी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!