Monday, September 21, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तमाहिती अधिकारातील मागितलेली माहिती; न देण्यास अधिकारी,कर्मचारी शोधतात पळवाटा...- ३० दिवसात माहिती...

माहिती अधिकारातील मागितलेली माहिती; न देण्यास अधिकारी,कर्मचारी शोधतात पळवाटा…- ३० दिवसात माहिती न दिल्यास काय समजावे?

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

संपादक/सत्यवान रामटेके

उद्रेक न्युज वृत्त :- ‘माहितीचा अधिकार कायदा २००५’ अंमलात येऊन जवळपास १७ वर्षांच्या वर कालावधी लोटूनही ‘एक ना धड भाराभर चिंध्या’असे माहिती अधिकार कायद्या अंतर्गतचे चित्र हल्ली  दिसून येत आहे.सार्वजनिक हिताची कितीही माहिती मागा; तरी माहिती अधिकारातील मागितलेली माहिती न देण्यास जनमाहिती असणारे अधिकारी व कर्मचारी पळवाटा शोधत आहेत.एखादी माहिती मागितल्यास ३० दिवसांचा कालावधी लोटूनही जातो.तरी सुद्धा माहितीच दिली जात नाही.माहिती दिली जात नसल्याने ‘दाल में कूछ काला है’ असे नक्की व पक्का समजावेच लागते.माहिती देणारे पळवाटा शोधून नुसता कागदोपत्री पत्रव्यवहार करून ‘तो मी नव्हेच’ अशी भूमिका बजावतांना दिसून येत आहेत.

आजच्या घडीला कित्तेक जणांना ‘माहिती अधिकार कायदा २००५’ काय आहे? हे अजूनही कळलेले नाही.जनमाहिती अधिकारी ३० दिवसांत माहिती देत नसले तरी अपिलीय अधिकारी राज्य माहिती आयोगाच्या २०१६ चे शासन परिपत्रकाचा दाखला देत केवळ ५० पृष्टे देण्याबाबत आदेश काढण्याचा सपाटा चालवला आहे.अपिलीय अधिकारी झोपेचा सोंग करतात की काय?असे हल्ली दिसून येत आहे.त्यांना माहीत आहे किंवा नाही; हेच कळेनासे झाले आहे.माहिती अधिकार अर्जाद्वारे एखादी माहिती मागितल्यास व मागितलेली माहिती ३० दिवसांत न दिल्यास अर्जदारास संपूर्ण माहिती मोफत देणे बंधनकारक आहे.मात्र या निर्णयाला अपिलीय अधिकाऱ्यांकडून ठेंगा दाखविला जातो आहे.तसेच काही अपिलार्थि यांना याबाबत माहिती नसल्याने  ‘गण्या’ बनविण्याचे काम सुरू आहे.

अशातच जनमाहिती अधिकाऱ्यांची बाजू अपिलीय अधिकारी घेत असल्याने अपील कर्त्यांना गोंधळात टाकले जात आहे.वेळेत माहिती पुरविली जात नसल्याने व माहिती देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने सर्वात जास्त माहिती अधिकाराची प्रकरणे राज्य माहिती आयुक्तांच्या खंडपीठात दाखल करण्यात येतात.वेळीच माहिती अधिकारातील प्रकरणे निकाली काढण्यात आली तर राज्य माहिती आयुक्तांचा वेळ व अपिलार्थी यांना होणारा मानसिक,आर्थिक व शारीरिक त्रास वाचू शकतो.मात्र तसे न होता माहिती अधिकारातील मागितलेली माहिती; न देता जनमाहिती अधिकारी,कर्मचारी पळवाटा शोधतांना दिसून येत आहेत.अशांवर लगेच आळा घालणे आवश्यक आहे.अन्यथा भ्रष्टाचाराचा सुळसुळाट होऊन ‘आम्ही करू ती पूर्वदिशा’ असे झाल्याशिवाय राहणार नाही.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सिंदेवाही प्रेस क्लबची नवीन कार्यकारिणी घोषित; अध्यक्षपदी प्रशांत गेडाम यांची निवड..

उद्रेक न्युज वृत्त  सिंदेवाही(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्ह्याच्या प्रेस क्लब सिंदेवाहीची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली.यामध्ये अध्यक्षपदी प्रशांत गेडाम, उपाध्यक्षपदी संतोष नन्नावार तर सचिवपदी सुधाकर गजभिये यांची...

मोबाइलच्या आहारी गेलेल्या विद्यार्थिनीने संपवली जीवनयात्रा; घरातच घेतला गळफास..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-मोबाईलची सवय अल्पवयीन मुलांसाठी जीवघेणी ठरू लागली आहे.पालक समजावण्याचा प्रयत्न करतात,पण काही जणांची स्थिती ऐकायला तयारच नसते आणि अनेकजण टोकाचे पाऊल...

महाराष्ट्र शासनाच्या वतीने गडचिरोलीत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग,सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि जिल्हा प्रशासन,गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या,मंगळवार २२ सप्टेंबर २०२६ रोजी...

भरधाव ट्रकची कारला मागून जोरदार धडक; दोघांचा करुण अंत,तर पाच जण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील कोरधा गावाजवळ एक अत्यंत भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.गावाकडे परत निघालेल्या कुटुंबीयांच्या कारला भरधाव ट्रकने मागून जोरदार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!