- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-अधिकार क्षेत्राबाहेरील कार्य करणे,भंडारा तहसीलच्या महिला तहसीलदार विनिता लांजेवार यांना चांगलेच भोवले आहे.प्रकरणी भंडाऱ्याच्या महिला तहसिलदारांची आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी उचलबांगडी केल्यानेच भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या भंडाऱ्याच्या तहसीलदार विनिता लांजेवार यांच्या तात्काळ बदलीची घोषणा काल,मंगळवारी २५ मार्चला विधानसभेत करण्यात आली.यासोबतच विभागीय आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशीचे आदेशही देण्यात आले. आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या लक्षवेधी प्रश्नावर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे आदेश दिले.
आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी ७ ऑगस्ट २०२४ रोजी भंडारा तहसीलदार विनिता लांजेवार यांच्या निलंबनासह चौकशीची मागणी केली होती.लांजेवार यांनी भंडारा तालुक्यातील एन.ए.पी.च्या ३८ प्रकरणांपैकी काही प्रकरणात आपल्या पदाचा दुरुपयोग करून अकृषकचे आदेश दिले होते. तहसीलदारांना असे आदेश देण्याचे अधिकार नसतात.तरीही त्यांनी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता-१९६६ च्या कलम ८५ नुसार,अधिकार नसतांना करधा,पिंगलाई,पहेला येथील जमिनींचे नियमबाह्य अकृषक आदेश पारित केले.खरबी येथील एकूण आराजी ९.०५ हे.आर.जमीन ग्रीन झोनमध्ये असतांना त्यांनी नियमबाह्य पद्धतीने जमीन अकृषक असल्याचा परवाना दिला.याशिवाय,अधिकार नसतांनासुद्धा त्यांनी नगर परिषद हद्दीत असलेल्या जमिनीला सुद्धा अकृषकचे आदेश काढून दिले.या प्रकरणात मोठा भ्रष्टाचार केल्याची तक्रार करीत आमदार भोंडेकर यांनी त्यांच्या निलंबनाची मागणी केली होती.याप्रकरणी चौकशी लावून त्यांना निलंबितसुद्धा करण्यात आले होते.मात्र मॅटमध्ये दाद मागितल्यावर निलंबनावर स्थगनादेश काढून त्यांना पुनश्च भंडारा येथे रुजू करण्यात आले होते.अशातच आता चौकशीचे आदेश काढण्यात आले असल्याने सदर प्रकरणी कारवाई अटळ असल्याचे दिसून येत आहे.
- Advertisement -