Tuesday, July 21, 2026
Homeगडचिरोलीतरुणांनी व शेतकऱ्यांनी मधमाशीपालन व्यवसायाकडे वळा - जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा..

तरुणांनी व शेतकऱ्यांनी मधमाशीपालन व्यवसायाकडे वळा – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-मधमाशी पालन हा कमी गुंतवणुकीत अधिक नफा देणारा,पर्यावरणपूरक आणि शाश्वत व्यवसाय असून जिल्ह्यातील तरुणांनी व शेतकऱ्यांनी स्वावलंबनासाठी व आर्थिक उन्नतीसाठी या व्यवसायाकडे वळावे,असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.
डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र सोनापूर गडचिरोली येथे “शास्त्रोक्त मधमाशीपालन प्रशिक्षण” या सात दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप आज,बुधवार २६ मार्च २०२५ रोजी करण्यात आला.कार्यक्रमाचे आयोजन कृषी विभाग गडचिरोली,महाराष्ट्र शासन व राष्ट्रीय मधमाशी मंडळ नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने २० ते २६ मार्च २०२५ दरम्यान करण्यात आले होते.
या समारोपिय कार्यक्रमात जिल्हाधिकारी पंडा यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करतांना मधाचे उत्पादन, मेण,राजान्न (रॉयल जेली),पोलन,प्रोपोलिस यांसारख्या आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या उत्पादनांमधून उत्पन्नाचे विविध स्रोत उपलब्ध होत असल्याचे सांगितले.तसेच मधमाशांमुळे होणाऱ्या परागीकरणामुळे शेतीतील फळे,फुले व भाजीपाला उत्पादनात सव्वा ते दीडपट वाढ होत असल्याचेही सांगितले.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती प्रिती हिरळकर यांनी मधमाशी पालनातून शेतकऱ्यांचे आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होत असून हा व्यवसाय शेतीपूरक असल्याचे सांगितले.
डॉ.किशोर कि.झाडे,वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख कृषी विज्ञान केंद्र सोनापूर-गडचिरोली यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.त्यांनी प्रशिक्षणाचा आढावा सादर करतांना या सात दिवसांत प्रशिक्षणार्थींना सैद्धांतिक व प्रात्यक्षिक पद्धतीने मधमाशीपालनाचे सखोल प्रशिक्षण देण्यात आल्याचे सांगितले.प्रशिक्षणादरम्यान तज्ञ मार्गदर्शक व मध व्यवसायिकांकडून मध,मेण, पोलन,राजान्न उत्पादनाचे विविध पैलू,बाजारपेठेतील मागणी,व्यवसायातील संधी याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली.
कार्यक्रमास पुष्पक ए.बोथीकर (पिक संरक्षण),डॉ. विक्रम एस.कदम (पशु संवर्धन व दुग्ध शास्त्र),सूचित के.लाकडे (उद्यानविद्या),डॉ.प्रितम एन.चिरडे (कृषीविद्या),नरेश बुद्धेवर (कृषी हवामान शास्त्र) विषय विशेषज्ञ तसेच अनेक शेतकरी बंधू-भगिनी उपस्थित होते.सदर कार्यक्रमास उपस्थितांचे आभार
 सूचित के.लाकडे यांनी मानले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन..पुढील चोवीस तास महत्वाचे; चार जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे चित्र आहे. हवामान विभागाने नुकतेच १९ जुलै ते २३ जुलै दरम्यान पाच दिवसांसाठी जोरदार...

ग्रामपंचायतींच्या जन सुविधा निधीत मोठी वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील ग्रामीण भागाचा विकास करतो म्हटले तर निधीचा अभाव,त्यातच निधीची कमतरता यामुळे स्थानिक पातळीवरील पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करणे अशक्य होते.यासाठी ग्रामीण...

शेतकऱ्यांना हलक्यात घेऊन त्यांच्याशी राजकीय डावपेच खेळाल तर पेचात पडाल- आमदार रोहित पवार

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या स्थितीत शेतकरी कर्जमाफी बाबत संभ्रम निर्माण झाला आहे.सरकारकडून नुसत्या तारखा देण्यात येत असल्याने शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र...

इंडिया स्किल्स स्पर्धेसाठी नोंदणी सुरू; राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कौशल्य सिद्ध करण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत सरकारच्या कौशल्य विकास उपक्रमांतर्गत आयोजित 'इंडिया स्किल्स'(IndiaSkills) आणि 'वर्ल्ड स्किल्स'(WorldSkills) स्पर्धांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून,त्या-त्या जिल्ह्यातील पात्र युवक-युवतींनी या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!