Saturday, June 20, 2026
Homeभंडाराभंडारा-गडचिरोली समृद्धी महामार्गाला शेतकऱ्यांचा कडकडीत विरोध..! - शेकडो शेतकरी धडकले तहसील...

भंडारा-गडचिरोली समृद्धी महामार्गाला शेतकऱ्यांचा कडकडीत विरोध..! – शेकडो शेतकरी धडकले तहसील कार्यालयावर

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-विदर्भात नागपूरपर्यंत समृद्धी महामार्ग पोहोचला आहे.पुढे त्याच्या विस्तार भंडाऱ्यापर्यंत व तेथून त्याचा विस्तार गडचिरोलीपर्यंत करण्याची घोषणा राज्य शासनाने घोषणा केल्यानंतर या मार्गाच्या सर्वेक्षण कामाला सुरुवात करण्यात आली आहे.मार्ग कोणत्या गावावरून जाईल व कोणत्या शेतकऱ्याची जमीन जाईल,हे निश्चित करण्यात आले आहे.त्यावरून या मार्गाचा आराखडा तयार करण्यात आला असून त्यानुसार जमीन हस्तांतरण करण्याबाबतच्या सूचना महसूल विभागास प्राप्त झाल्या आहेत.अशातच आज,गुरुवारी १६ जानेवारीला भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातून गडचिरोली जिल्ह्यात जाणाऱ्या समृद्धी महामार्गाला लाखांदूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी कडकडीत विरोध केला आहे.यासंदर्भात शेकडो शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर धडक देत तहसीलदार यांच्या मार्फतीने
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले.लाखांदूर तालुक्यातून भंडारा ते गडचिरोली द्रुतगती महामार्ग जात असून संबंधित विभागाच्या वतीने जमीन हस्तांतरीत करण्यासाठी कारवाई सुरू केली.मात्र,सदर रस्त्यासाठी शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहित करण्यापूर्वी शेतजमिनीची किंमत किती मिळणार? हे अद्यापही शेतकऱ्यांना कळविण्यात आले नाही.त्यामुळे शेतकरी संभ्रमित आहेत.शिवाय शासनाने बळजबरीने शेतीची मोजणी करणे सुरू केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
आज गुरुवारी १६ जानेवारी रोजी शेतकऱ्यांनी शेती मोजणीकरीता शेतावर हजर राहावे,अन्यथा पुनर्मोजणीचे पैसे शेतकऱ्यांकडून वसूल केल्या जाईल,असे पत्र देण्यात आल्याने शेतकरी संतापले आहेत.लाखांदूर तालुक्यात सिंचनाची सोय असून येथील शेती बारमाही पिकाची आहे.समृद्धी महामार्गामुळे अनेक शेतकरी भूमिहीन होण्याची भीती आहे.एक रुपयाचा मोबदला न देता उलट शासन दडपशाही करीत असल्याने तोडगा काढण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेऊन आम्हा शेतकऱ्यांशी चर्चा करावी व भेटीसाठी वेळ द्यावी,आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.
तहसीलदार वैभव पवार यांनी संतप्त शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारले.यावेळी द्रुतगती महामार्ग शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष विनोद ढोरे,उपाध्यक्ष प्रभू मेंढे, सचिव रमेश राऊत,कोषाध्यक्ष स्वप्नील ठेंगरी सह तालुक्यातील शेकडो शेतकरी बांधव उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

खतरनाक कारनामा..! नीट परीक्षेच्या विद्यार्थ्याला चक्क परदेशातील दिले परीक्षा केंद्र..

उद्रेक न्युज वृत्त नागपूर :-काही कालावधीपासून पेपरफुटी तसेच शिक्षणाच्या आयचा घो होत असल्याने होतकरू विद्यार्थ्यांचे उज्वल भवितव्य धोक्यात येऊ लागले आहे.पालक वर्ग आपली मुले शिकून...

तीन तिघडा अन् काम बिघडा..! वन परिक्षेत्र अधिकारी,वनरक्षक व खाजगी इसम एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त गडचिरोली :-अनेकांना वाटतेय की,एखाद्या तिसऱ्याच व्यक्तींच्या माध्यमातून पैश्याची रक्कम घेतली,तर आपले नाव वा आपली करणी उजेडात येणार नाही.पण,लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तसला...

गडचिरोली जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांमुळे लक्षणीय पाणीसाठा निर्माण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात मागील दोन वर्षांत विविध योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत.या कामांमुळे जिल्ह्यात लक्षणीय पाणीसाठा निर्माण झाला असून...

आता भाडेपट्ट्यावरील शासकीय जमिनींच्या अधिकार अभिलेखात असणार ‘महाराष्ट्र शासन’ कब्जेदार..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील भाडेपट्ट्याने प्रदान करण्यात आलेल्या शासकीय जमिनींच्या अधिकार अभिलेखातील नोंदी अधिक अचूक,पारदर्शक आणि एकसमान करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.मुख्यमंत्री...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!