- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नवी दिल्ली :-बाटलीबंद पाणी आरोग्याच्या दृष्टीने अतिधोकादायक असल्याने बाटलीबंद पाण्यास हायरिस्क फूड वर्गवारीमध्ये टाकण्याचा निर्णय अन्नसुरक्षा मानके प्राधिकरणाने (एफएसएसएआय) घेतला आहे.बाटलीबंद पाणी आणि मिनरल वॉटर सेगमेंट आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे विविध नमुन्यांतून आढळून आले आहे.त्यामुळे बाटलीबंद पाण्याची तपासणी त्रयस्थ पार्टीकडून करण्याची शिफारस एफएसएसएआयने केली आहे. केंद्र सरकारने ऑक्टोंबर महिन्यात बाटलीबंद पाणी आणि मिनरल वॉटर उद्योगासाठी ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्सच्या (बीआयएस) प्रमाणपत्राची अट रद्द केली होती.या पार्श्वभूमीवर अन्नसुरक्षा विभागाने बाटलीबंद पाणी आरोग्याच्या दृष्टीने अतिधोकादायक असल्याचे स्पष्ट केले आहे.
पॅकेज्ड वॉटरसाठी बीआयएसच्या प्रमाणपत्राची अट काढून टाकण्यात आल्यामुळे बाटलीबंद पाण्याचा धोकादायक श्रेणीत समावेश करण्यात आल्याची माहिती अन्नसुरक्षा विभागातील सूत्रांनी दिली. बाटलीबंद पाण्याचा समावेश फूड प्रॉडक्टमध्ये होतो. त्यामुळे पॅकेज्ड वॉटरचा अतिधोकादायक श्रेणीत समावेश करण्यात आला आहे.मिनरल वॉटर मॅन्युफॅक्चरर्स आणि प्रोसेसर्सना यापुढे काटेकोरपणे प्रोटोकॉलची अंमलबजावणी करावी लागणार आहे.
बाटलीबंद पाणी आणि मिनरल वॉटर उत्पादकांना पॅकेज्ड वॉटरचे वर्षातून एकदा मान्यताप्राप्त संस्थेकडून ऑडिट केल्यावरच परवाना द्यावा; असेही एफएसएसएआयने म्हटले आहे.
- Advertisement -