Friday, April 17, 2026
Homeनागपूरअज्ञात वाहनाने बिबट्याला उडविले; बिबट्याचा घटनास्थळीच मृत्यू

अज्ञात वाहनाने बिबट्याला उडविले; बिबट्याचा घटनास्थळीच मृत्यू

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-वेगात जाणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरात धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या बिबट्याचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना खापा,ता.सावनेर, पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खेकरानाला चोरखैरी रायवाडी मार्गावर काल,मंगळवारी सकाळच्या सुमारास घडली.बिबट्या रोड ओलांडत असतांना त्याला वाहनाने धडक दिली असावी; अशी शक्यता वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.खेकरानाला चोरखैरी – रायवाडी मार्गावर बिबट्याचा अपघाती मृत्यू झाल्याची माहिती मंगळवारी सकाळी काही नागरिकांनी वनसंरक्षक ऐश्वर्या शिंदे व खाप्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन आठवले यांना दिली.त्यामुळे या दोन्ही अधिकाऱ्यांनी क्षेत्र सहाय्यक सतीश गडलिंगे व सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठून पाहणी केली. सहायक वनसंरक्षक (तेंदू व कॅम्पा) विजय गंगावणे, मानद वन्यजीव रक्षक अविनाश लोंढे यांनीही घटनास्थळाची प्रत्यक्ष पाहणी केली.
या सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा केल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश फुलसुंगे, डॉ.बी.डी.कोहड व डॉ.मुकुंदा जोगेकर यांच्या चमूने  मृत बिबट्याचे पोस्टमार्टम केले.त्यानंतर संपूर्ण प्रक्रिया व सोपस्कार पूर्ण करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली.यावेळी वनरक्षक कडू कुकलारे,साहेबराव शेलार,पी.भंडारे,एन.गिरी,बी.राठोड,वनमजूर बंडू सोनटक्के,राजू भसराम व चालक पंकज कोल्हे आदी वनविभागाचे कर्मचारीही उपस्थित होते. याप्रकरणी वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ चे कलम ३९, ९ अन्वये अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवून वनविभागाने तपासाला सुरुवात केली आहे.
मृत बिबट्याचे वय अंदाजे दीड वर्ष असल्याची माहिती वनअधिकाऱ्यांनी दिली.सावनेर तालुक्यातील खेकरानाला,रायवाडी हा संपूर्ण परिसर जंगलव्याप्त असून,या भागात वाघ,बिबट आणि इतर वन्यप्राण्यांचे वास्तव्य व वावर आहे.याच परिसरात खेकरानाला जलाशय असून,प्राण्यांना पिण्यास मुबलक पाणी मिळते.खापा रायवाडी हा मार्ग पुढे मध्य प्रदेशला जोडला असल्याने या मार्गावर वाहनांची सतत वर्दळ असते.येथील वन्यप्राणी नेहमी हा रस्ता ओलांडतात.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सोशल मीडियाच्या स्नॅपचॅटवर ओळख; बोलणे बंद करताच अश्लील फोटो व व्हिडीओ क्लिप केले व्हायरल.. – आरोपी तरुणास बेड्या..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २६ वर्षीय तरुणाची सोशल मीडियाच्या स्नॅपचॅटवर १९ वर्षीय तरुणीशी ओळख झाली.दोघांचेही स्नॅपचॅटवर चॅटिंग सुरू झाले. चॅटिंगदरम्यान तरुण हा आपल्या नातेसंबंधातीलच...

बापरे..! कासवांची तस्करी करणाऱ्यांकडून धक्कादायक बाबी उघड.. – अघोरी पूजेचे अत्यंत किळसवाणे व्हिडिओ आणि चॅटिंग..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द उपक्षेत्राच्या नियतक्षेत्र शिर्शी बिटातील चिचडोह बॅरेजवरून हरंबा गावाकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर कासवाची तस्करी करणारी टोळी सक्रिय असल्याची...

विद्यार्थ्यांसह नागरिकांसाठी राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा; प्रथम बक्षीस ३१ हजार रुपये..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-कौशल्य,रोजगार व उद्योजकता,नाविन्यता विभागामार्फत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती प्रीत्यर्थ राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.या स्पर्धेत राज्यभरातील विद्यार्थी...

कामगारांसाठी दिलासादायक निर्णय; आता गोण्यांचे वजन राहणार ५० किलोपर्यंतच..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-डोक्यावर,पाठीवर ओझे वाहून नेणारे, अंगमेहनतीची कामे करणारे कामगार म्हणजेच माथाडी(हमाल)कामगारांना दररोज जड गोण्या(पोते) उचलण्याचे काम करावे लागते.धान,कांदा,बटाटा आणि इतर शेतमालाच्या व्यवहारात अनेक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!