Saturday, August 29, 2026
Homeनागपूरमोबाइलवर बोलण्याच्या नादात बँकेच्या शाखा व्यवस्थापकाने कारने उडवले पती-पत्नीला..

मोबाइलवर बोलण्याच्या नादात बँकेच्या शाखा व्यवस्थापकाने कारने उडवले पती-पत्नीला..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-मोबाइलवर बोलण्याच्या नादात एका खासगी बँकेत शाखा व्यवस्थापक असलेल्या कार चालकाने दुचाकीने घरी परतणाऱ्या पती-पत्नीला धडक दिली. धडक इतकी भीषण होती की,पती आणि पत्नीचा जागीच मृत्यू झाला.विजय भगवान सावरकर वय ५३ वर्षे,रा.घरकुल सोसायटी,हरिहरनगर व सुरेखा सावरकर वय ४८ वर्षे अशी मृत दाम्पत्यांची नावे असून दोघेही नातीच्या वाढदिवसावरून घरी परत जात असतांनाच मध्यरात्रीच्या सुमारास सदरचा अपघात घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.कारचालक पंकज बाळकृष्ण डेकाटे वय ४७ वर्षे,चिमुरकर ले आऊट,न्यू नरसाळा,नागपूर याने अपघातानंतर मदत करण्याऐवजी कार सोडून घटनास्थळावरून पळ काढला.विशेष म्हणजे,तो दारूच्या नशेत गाडी चालवत होता.
विजय सावरकर व सुरेखा सावरकर यांची मुलगी प्राजक्ता व जावई नितीन कळंबे यांच्या मुलीचा बुधवारी पहिला वाढदिवस होता.नातीचा वाढदिवस असल्याने सावरकर दांपत्य दिघोरीतील आराधनानगर येथे कार्यक्रमासाठी गेले होते.कार्यक्रम आटोपल्यावर रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास ते दुचाकीने  घराकडे जात होते.बेसा चौक ते पुरुषोत्तम बाजार चौकाजवळ एमएच ४९ बीडब्लू ४२२६ क्रमांकाच्या किया सोनेट कारच्या चालकाने त्यांना भरधाव वेगात येत समोरून धडक दिली.त्यात सावरकर दाम्पत्य खाली पडून गंभीर जखमी झाले.घटनास्थळावरून वन विभागाचे अधिकारी जात होते.आरोपी डेकाटेने त्यांच्या गाडीलादेखील कट मारला होता.सावरकर दांपत्याला जखमी अवस्थेत पाहून त्यांनी तातडीने दोघांनाही मेडिकल रुग्णालयात नेले.मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.भारतीय सैन्यात कार्यरत असलेले सावरकर यांचे जावई नितीन कळंबे यांच्या तक्रारीवरून कारचालक पंकज डेकाटे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला व त्याला अटक करण्यात आली आहे.आरोपी पंकज डेकाटे हा महालात एका खासगी बँकेच्या शाखेत व्यवस्थापक आहे.तो दारूच्या नशेत होता.कार वेगात चालवत असतांना त्याला फोन आला.मोबाइल उचलण्याच्या नादात त्याचे कारवरील नियंत्रण सुटले व त्याने समोरून थेट सावरकर दाम्पत्याला धडक दिली.वेग इतका जोरात होता की डेकाटेची कार समोर जाऊन एका खांबालादेखील धडकली.प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार मुकुंद कवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद शाळेत राखी मेकिंग स्पर्धा व रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न.. -विद्यार्थ्यांनी देसाईगंज पोलिस बांधवांना राखी बांधून व्यक्त केली...

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या 'पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा जुनी वडसा' येथे आज,शनिवार २९ ऑगस्ट रोजी 'एक राखी देशाचे...

पोलीस दलात खळबळजनक घटना..! पोलीस उपनिरीक्षकाने धावत्या रेल्वे समोर घेतली उडी; घटनास्थळीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच १६ ऑगस्ट २०२६ रोजी नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील जनसंपर्क व अर्ज शाखेत कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय)यांनी शासकीय निवासस्थानी गळफास...

देसाईगंज तालुक्यात रोजगार हमीच्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार.. – काम न करताच उचलली लाखो रुपयांची बिले..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्यात यंत्रणा स्तरावरून करण्यात आलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये मोठा कथित भ्रष्टाचार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.यात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या...

सर्व अन्न विक्रेते व्यावसायिकांना परवाना घेणे बंधनकारक.. – पाणीपुरी पासून ते चहा विक्रेते व इतर परवाना नसणाऱ्यांवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-अन्न व्यावसायिक विक्रेत्यांना व्यवसाय करण्यासाठी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलम ३१ अंतर्गत परवाना घेणे किंवा नोंदणी प्रमाणपत्र घेणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!