Thursday, May 28, 2026
Homeभंडाराबचत गटांच्या महिलांना माहीत न करताच सहा महिला बचत गटांच्या नावाने कर्जाची...

बचत गटांच्या महिलांना माहीत न करताच सहा महिला बचत गटांच्या नावाने कर्जाची उचल.. – कर्ज न भरल्याची नोटीस येताच प्रकरणास फुटली वाचा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-ज्यांच्यावर विश्वास ठेवतात,असाच व्यक्ती विश्वासघातक करत असतो.पैश्याचा मोह भल्या-भल्यांना ठरकी बनवत असतो.असाच काहीसा प्रकार भंडारा जिल्ह्यात उघडकीस आला आहे.महिला वर्गांना सुरुवातीला बचत गटांच्या नावाने भुरळ घालण्यात आली आणि त्यांच्याच रकमेवर तसेच त्यांच्याच बचत गटांच्या नावावर तब्बल ३४ लाख ६ हजार रुपयांवर तीन महिलांनी डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.विशेष म्हणजे,सहा बचत गट स्थापन करण्यात आली आणि सहाही बचत गटांच्या नावावर मोठ्या रकमेचे कर्ज काढून रकमेचे भरणा न केल्याने बचत गटांना बँकेची नोटीस येताच प्रकरणास वाचा फुटली आणि प्रकरण पोहचले थेट पोलीस ठाण्यात.प्रकरणी तिन्ही महिलांवर गुन्हे दाखल करून पोलिसांनी ताब्यात घेतले.
याबाबत अधिक प्रकरण असे की,भंडारा तालुक्याच्या गणेशपूर येथे भंडारा शहराच्या म्हाडा कॉलनीतील ४५ वर्षीय दीपिका रामलाल ठाकूर नामक महिला श्रृतिका ब्युटी पार्लर चालवते.पार्लरमध्ये गणेशपूर येथील
कल्याणी प्रशांत मते ही महिला नेहमी जायची.त्यामुळे ओळख वाढली.या ओळखीचा फायदा घेत दीपिका ठाकूर हिने कल्याणी मते व इतर महिलांना विश्वासत घेऊन महिलांचा बचत गट तयार करू,त्यासाठी दरमहा १०० रुपये जमा करायचे सुचविले.भविष्यात सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेता येईल,असेही सांगितले. याप्रमाणे दीपिका ठाकूर या महिलेने ६ बचत गट तयार केले.सहाही बचत गटातील सर्व महिलांना आपल्या ब्युटी पार्लरमध्ये बोलावून महिला आर्थिक विकास महामंडळ तसेच नवप्रभा लोकसंचालित साधन केंद्र भंडाराच्या सहयोगिनी बबिता लक्ष्मण देवूळकर यांच्यामार्फत बैंक ऑफ बडोदाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने बचत गटाचे खाते उघडतो,असे सांगून कोऱ्या फॉर्मवर सह्या घेतल्या. प्रत्यक्षात बँकेत खाते उघडलेच नाही.बचत गटाचे सदस्य होण्यासाठी प्रत्येक महिलेकडून १०० रुपये असे २ लाख ८ हजार रुपये डिसेंबर २०२१ ते जुलै २०२५ च्या दरम्यान गोळा केले.ते सुद्धा बचत गटाच्या खात्यावर भरलेच नाही.एवढेच नाही तर,सहाही बचत गटांच्या नावावर मोठ्या रकमेचे कर्ज परस्पर उचलले.यात
सखी मंच बचत गटाच्या नावे ६ लाख रुपयांचे कर्ज उचलण्यात आले.त्यापैकी ३ लाख ३० हजार रुपयांचे कर्ज थकीत झाले.अश्याच प्रकारे आशा बचत गटाच्या नावे ६ लाखांचे कर्ज उचलून ३ लाख २० हजारांची थकबाकी.कावेरी महिला बचत गटाच्या नावे ६ लाखांचे कर्ज घेऊन ३ लाख ५० हजारांची थकबाकी.
नमो बुद्धा महिला बचत गटाच्या नावे ४ लाखांचे कर्ज उचलून २ लाख थकीत,मैत्री बचत गटाच्या नावे ४ लाख ९८ हजार आणि त्याच गटाच्या नावे ५ लाख कर्ज उचलून अनुक्रमे ४ लाख ६८ हजार व २ लाख ७४ हजार रुपये थकीत करण्यात आले.बँक ऑफ बडोदाकडून या बचत गटांना कर्ज न भरल्याची नोटीस आली.त्यामुळे महिलांनी बँकेत चौकशी केली असता, कर्जाच्या अर्जावर स्वाक्षऱ्या घेऊन दीपिका ठाकूर, बबिता देवूळकर तसेच व्यवस्थापक ललिता देवीदास कुंभलकर यांनी संगणमताने कर्ज उचलण्यासाठी पत्र दिले.त्या पत्रावरून सहा महिला बचत गटांच्या नावाने कर्जाची उचल केल्याचे स्पष्ट झाले.प्रकरणी कल्याणी मते यांच्या तक्रारीवरून,दीपिका रामलाल ठाकूर वय ४५ वर्षे,म्हाडा कॉलनी,भंडारा,नवप्रभा लोकसंचालित साधन केंद्र भंडाराची व्यवस्थापक ललिता देवीदास कुंभलकर (खात) आणि या केंद्राच्या भंडाराच्या सहयोगिनी बबिता लक्ष्मण देवूळकर यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१६(२),(५),३१८ (४),३३६ (२),(३),३३८, ३४०(२),३(५) नुसार गुन्हे दाखल करून ताब्यात घेतले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या इसमाचा शेतशिवारात आढळला मृतदेह.. – वाघाच्या अफवेने वनविभागासह पोलिस यंत्रणेची मोठी धावपळ..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-घरच्यांना दवाखान्यात जात असल्याचे सांगून गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या इसमाचा चक्क शेतशिवारात मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली.पण,मृतदेहावरील खुणा पाहून...

जंगली डुकराची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा मुख्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर जंगली डुकराची धावत्या दुचाकीला जोरदार धडक बसल्याने दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना...

५० हजार देऊनही २५ हजारासाठी तगादा; मंडळ अधिकारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका लाचखोर मंडळ अधिकाऱ्याने  शेतजमीनीचे फेरफार करण्यासाठी तब्बल ७५ हजाराची लाच मागणी करून त्यातील ५० हजार घेऊन फेरफार करून दिले,पण उर्वरित...

अजब-गजब कारनामा..! वसतिगृहात कुलरची मागणी केली म्हणून विद्यार्थिनीला हकालपट्टीची नोटीस..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सध्या विदर्भात तीव्र उष्णतेची लाट सुरू आहे. यामुळे जीवाची लाही-लाही होत आहे.प्रचंड उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.त्यातच,पंखे व इतर हवेच्या साधनांनी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!