Saturday, September 5, 2026
Homeचंद्रपूरट्रक आणि प्रवाशी रिक्षाचा भीषण अपघात; अपघातात ६ जणांचा मृत्यू..!

ट्रक आणि प्रवाशी रिक्षाचा भीषण अपघात; अपघातात ६ जणांचा मृत्यू..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्यात भीषण अपघाताची घटना उघडकीस आली आहे.हायवा ट्रक आणि प्रवाशी रिक्षा यांच्यात समोरासमोर धडक बसल्याने रिक्षाचा चक्काचूर होऊन तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन प्रवाशांनी वाटेतच प्राण सोडला.तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना आज,गुरुवार २८ ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजेच्या दरम्यान राजुरा तालुक्यातील गडचांदूर रस्त्यावरील कापणगावाजवळ घडली.भीषण अपघातात रिक्षाचालक प्रकाश मेश्राम वय ४९ वर्षे,रवींद्र हरी बोबडे,वय ४८ वर्षे,तनु सुभाष पिंपळकर वय १८ वर्षे व ताराबाई नानाजी पापुलवार वय ६० वर्षे हे सर्व चारहीजण राजुरा तालुक्याच्या पाचगाव येथील रहिवासी असून शंकर करू पिपरे,वय ५० वर्षे, रा.कोची व वर्षा बंडू मांडले वय ४१ वर्षे,रा.खमोना असे मृत पावलेल्या सहा जणांची नावे आहेत.तर निर्मला रावजी झाडे वय ५० वर्षे रा.पाचगाव व भोजराज महादेव कोडापे वय ४० वर्षे रा.भुरकुंडा अशी गंभीर जखमींची नावे असून त्यांच्यावर चंद्रपूर तसेच राजुरा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आज गुरुवारी दुपारच्या सुमारास राजुराहून खामोनी-पाचगाव येथे हायवा ट्रक जात होता,तर गडचांदूर येथून राजुराच्या दिशेने रिक्षाचालक व सात प्रवाशी रिक्षाने जात होते.अश्यातच रिक्षा कापणगावाजवळ सर्विस रोड वरून हायवे वर जाताच विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने रिक्षाला जोरदार धडक दिली.धडक इतकी जोरदार होती की,तीन प्रवाशी घटनास्थळीच ठार झाले.तर तीन प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्याकरीता नेत असतांना वाटेतच मृत्यू झाला. घटना घडताच ट्रक चालक ट्रक सोडून घटनास्थळावरून पसार झाला.राजुरा पोलिसांनी घटनास्थळ गाठून ट्रक ताब्यात घेतला आहे.घटनेचा पुढील तपास राजुरा पोलीस प्रशासन करीत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘या’ उमेदवारांना मिळणार मुलाखतीची तयारी करण्यासाठी १० हजाराचे आर्थिक सहाय्य..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षा-२०२५ मध्ये उत्तीर्ण झालेल्या अनुसूचित जातीच्या उमेदवारांना मुलाखतीची तयारी करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व...

सतर्कता बाळगा..! नुकसानभरपाईच्या बहाण्याने शेतकऱ्यांकडून घेतले आधार कार्ड,पॅन कार्ड आणि सातबारे उतारे.. – अन् उचलले ७३ कोटींहून अधिकचे कर्ज..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-भोळ्या-भाबड्या,गरीब आणि अल्पशिक्षित शेतकऱ्यांना सरकारी योजनेअंतर्गत दरवर्षी दहा हजारांची नुकसाभरपाईची मदत मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांची कागदपत्रे मिळवली आणि त्यांच्याच नावावर...

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!