Sunday, September 6, 2026
Homeगडचिरोलीउत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय आणि उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित..

उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय आणि उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालयामार्फत राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास साधण्यासाठी तसेच वाचनसंस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी दरवर्षी प्रतिष्ठेचे पुरस्कार दिले जातात. यामध्ये “डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार” तसेच ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते आणि सेवकांसाठी “डॉ.एस.आर.रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार” यांचा समावेश आहे.
  • सार्वजनिक ग्रंथालयांसाठी पुरस्कार👇
  • राज्यातील शहरी आणि ग्रामीण विभागातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना त्यांच्या वर्गानुसार रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि ग्रंथभेट देऊन गौरविण्यात येते.
“अ” वर्ग ग्रंथालय– १ लाख रुपये
“ब” वर्ग ग्रंथालय– ७५ हजार रुपये
“क” वर्ग ग्रंथालय –५० हजार रुपये
“ड” वर्ग ग्रंथालय – २५ हजार रुपये
  • कार्यकर्ता व सेवकांसाठी पुरस्कार👇
भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ.शियाली रामामृत रंगनाथन यांच्या नावाने राज्यस्तरावर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रंथालय कार्यकर्त्यांना आणि सेवकांना विशेष सन्मान दिला जातो.
एक राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व एक राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथालय सेवक यांना प्रत्येकी ५० हजार रुपये.तर प्रत्येक महसुली विभागातील एक उत्कृष्ट कार्यकर्ता व सेवक यांना प्रत्येकी २५ हजार रुपये.
  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख👇
सन २०२४-२५ या वर्षाच्या पुरस्काराकरिता इच्छुक ग्रंथालये,कार्यकर्ते आणि सेवक (ग्रंथमित्र) यांनी आपला विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रांसह तीन प्रतीत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडे सादर करावा.अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर २०२५ अशी आहे,असे जिल्हा ग्रंथालय अधिकारी एस.एस.गजभारे यांनी कळविले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

तलावात मासे पकडत असतांनाच पाय घसरल्याने तलावात पडला; चिमुकल्याचा तलावात बुडून मृत्यू.. -दुसऱ्या घटनेत भारतीय सैन्य दलातील जवानाचा पाण्यात बुडून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील निलज गावातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. शाळेला सुट्टी असल्याने मित्रांसोबत गाव नजीकच्या तलावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!