Saturday, September 12, 2026
Homeभंडाराप्रेयसीचे लग्न जुळले; भेटायला गेला अन् दोघांनीही विष प्राशन केले.. - प्रियकराचा...

प्रेयसीचे लग्न जुळले; भेटायला गेला अन् दोघांनीही विष प्राशन केले.. – प्रियकराचा मृत्यू तर प्रेयसी रुग्णालयात..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-बऱ्याच कालावधीपासून सुरू असलेल्या प्रेमाचा एका निर्णयाने शेवट झाल्याची घटना उघडकीस आली आहे.खरच मनापासून प्रेम करणारे कुठल्याही सीमा पार करू शकतात.हे घडलेल्या घटनेवरून स्पष्ट झाले आहे.भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील घोरपड गावातील २५ वर्षीय  तरुणाचे नागपूर जिल्ह्याच्या मौदा तालुक्यातील दुधाळा गावातील एका तरुणीवर जीवापाड प्रेम होते.हळूहळू दोघांमध्ये प्रेम बहरून आले.मात्र,बहरणाऱ्या प्रेमाला कुणाची तरी नजर लागली अन् क्षणात होत्याचे नव्हते झाले.तरुणीचे लग्न जुळले,याची भनक तरुणास लागताच बुधवार १९ नोव्हेंबरच्या रात्री तरुण कुणाला काहीही न सांगता घरून प्रेयसीला भेटण्याकरिता दुधाळा येथे गेला.दोघांचीही भेट झाली आणि त्याच मध्यरात्री दोघांनीही विष प्राशन केल्याने यात घोरपड गावातील २५ वर्षीय पुनित नरेश भालावीर या तरुणाचा मृत्यू झाला,तर तरुणीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.घटनेने समाजमन सुन्न झाले असून पुनीतच्या पार्थिवावर काल गुरुवारी दुपारच्या सुमारास घोरपड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सासऱ्याने केला सुनेचा खून अन् स्वतःच मारली विहिरीत उडी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या यशोधरानगर पोलिस ठाणे हद्दीच्या पिवळी नदी परिसरातील पाहुणे ले-आऊटमध्ये एक खळबळ उडवणारी घटना आज,शनिवार १२ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस...

राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता; दोन दिवस पावसाचे..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.पुढील दोन दिवस राज्यातील विविध भागात पावसाची तीव्रता कायम राहणार...

नोकरीचे खोटे नियुक्तीपत्र दाखवून दोन महिलांची फसवणूक; दोघांवर गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-मंत्रालयात चांगली ओळख असल्याची बतावणी करून सरकारी रुग्णालयात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत दोन महिलांची तब्बल १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा...

आता ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार विस्तार अधिकाऱ्यांकडे; विस्तार अधिकारी बनले प्रशासक..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सुरळीत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!