- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली,देसाईगंज आणि आरमोरी या तीन नगर परिषदांच्या थेट नगराध्यक्ष तसेच नगरसेवक सदस्य पदांच्या निवडणुकांसाठी मैदानात उतरलेल्या उमेदवारांची यादी सोमवार,१७ नोव्हेंबरला प्रसिद्ध करण्यात आली होती.त्यानुसार,देसाईगंज नगर परिषदेत थेट नगराध्यक्ष पदासाठी ९ उमेदवारी अर्ज,तर सदस्य पदासाठी १३२ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.अश्यातच आज,शुक्रवार २१ नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती.त्यानुसार,आज थेट नगराध्यक्ष पदासाठी ९ उमेदवारी अर्ज दाखल केल्यांपैकी केवळ दोन महिलांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. यात शालुताई दिवाकर दंडवते व प्रविणा दिपक विधाते यांनी थेट नगराध्यक्ष पदावरून माघार घेतल्याने आता थेट नगराध्यक्ष पदासाठी ६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.तर नगरसेवक पदावरून केवळ १० उमेदवारांनी माघार घेतल्याने आता तब्बल १२२ उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत.
- देसाईगंज नगर परिषद नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात 👇
१.निता संजय गुरु – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी(एन.सी.पी.)
२.सुनीता अशोक ठेंगरी- शिवसेना उबाठा
३.पुष्पा अजय सरकार- बहुजन समाज पार्टी
४.वनिता अशोक नाकतोडे- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टी
५.लता मुरलीधर सुंदरकर- भारतीय जनता पार्टी
६.भारती संदीप दहिकर- अपक्ष
- नगर सेवक पदावरून माघार घेतलेले उमेदवार👇

- Advertisement -

