Thursday, September 3, 2026
Homeभंडाराप्रेम प्रकरणासाठी वर्ग मैत्रिणीला त्रास; तणावापोटी आत्महत्येसारखे पाऊल.. - दोन अल्पवयीन मुले...

प्रेम प्रकरणासाठी वर्ग मैत्रिणीला त्रास; तणावापोटी आत्महत्येसारखे पाऊल.. – दोन अल्पवयीन मुले आणि एका मुलीविरुद्ध पोक्सोअंतर्गत गुन्हे दाखल..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-जिल्ह्याच्या पवनी शहरात खळळजनक तितकाच धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.तीन अल्पवयीनांनी आपल्याच वर्ग मैत्रिणीला प्रेमासाठी दबाव निर्माण केल्याने तणावात गेलेल्या एका मुलीने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला.मात्र,सदरची बाब आईवडिलांना कळताच मोठा अनर्थ टळला व दोन १७ वर्षीय अल्पवयीन मुले आणि एका अल्पवयीन मुलीवर तक्रारी अंती भारतीय न्याय संहितेच्या कलम ७८,१२६(२),३५१ (२),सहकलम १२,१६ पोक्सो नुसार गुन्हा नोंद करून काल सोमवारी तिघांनाही भंडारा जिल्हा सत्र न्यायालयापुढे हजर केले असता  तिघांचीही जामिनावर सुटका करून ताकीद देण्यात आली.
१७ वर्षीय दोन मुले व दोन मुली दहावीपर्यंत वर्गमित्र होते.नंतर वेगवेगळ्या शाळेत गेले.बारावीत गेल्यानंतर एकमेकांच्या संपर्कात नव्हते.मात्र,बारावी विषयांच्या क्लासमध्ये(शिकवणी वर्ग)परत संपर्कात आले.अश्यातच एका १७ वर्षीय मुलाचे एका मुलीकडे आकर्षण वाढून पाठलाग करणे व प्रेमासाठी वाट्टेल ते..असे करणे सुरू झाले.परत सहकारी मित्र व मैत्रीण यांनीही दबाव निर्माण करू पाहला.त्यामुळे ती तणावात गेली.नेहमी हसत खेळत असणारी मुलगी तणावात असल्याचे आई वडिलांच्या लक्षात आले.त्यांनी तिला विश्वासात घेत विचारपूस केली असता प्रकरणाचा उलगडा झाला. प्रकरणी पालकांनी  पवनी पोलिस स्टेशन गाठून तक्रार नोंदवली.चौकशी अंती धक्कादायक प्रकार पुढे आला. ज्या वयात शिक्षणाची तसेच भविष्याची गोडी निर्माण व्हावी,अश्या वयात शाळकरी मुले वाम मार्गाला जाऊ लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!