Wednesday, September 2, 2026
Homeकोंढाळाकोंढाळा ग्रामपंचायततर्फे तंटामुक्त गाव रस्त्यांसाठी शिवार फेरी..

कोंढाळा ग्रामपंचायततर्फे तंटामुक्त गाव रस्त्यांसाठी शिवार फेरी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कोंढाळा(गडचिरोली):-सध्या पांदण रस्त्यांबाबत सर्वत्र समस्या असून रस्त्यावरील अतिक्रमणांमुळे दरवर्षी शेतकऱ्यांमध्ये भांडण आणि तंटे वाढले आहेत.यासाठी पांदण रस्त्यांची नोंद असलेल्या व नसलेले रस्त्यांची मोजमाप करून अतिक्रमणे काढली जाणार आहेत तसेच आक्षेपार्ह बाबींवर सुनावणी करून संबंधित रस्त्यांचा क्रमांक नकाशात नोंद करण्यात येणार आहे. महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख,कार्यक्षम आणि गतिमान करण्यासाठी राज्यामध्ये १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबरपर्यंत ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ राबविण्यात येत आहे.या अभियानात पांदण रस्त्यांचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.तत्पूर्वी देसाईगंज तालुक्याच्या ग्रामपंचायत कोंढाळा अंतर्गत तंटामुक्त गाव रस्त्यांसाठी शिवार फेरी काढण्यात आली.शिवार फेरीत परिसरातील पांदण रस्त्यांची पाहणी करून नोंद घेण्यात आली.सेवा पंधरवाड्यात पांदण रस्ते मोकळे करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.त्याचबरोबर,लक्ष्मीमुक्ती योजनेनुसार शेतीच्या ७/१२ वर पत्नीच्या नावाची नोंद करण्यासाठी तालुक्यातील खातेदारांना प्रवृत्त केले जाणार आहे.तसेच दिव्यांगांना घरपोच रेशन दिले जाणार आहे.
गावपातळीवर गावठाण्यातील २०११ आधीची अतिक्रमणे नियमित करून त्यांना घर देण्यासाठी अतिक्रमित जागांच्या मालकी हक्क देण्याच्या दृष्टीने तसेच पांदण रस्ते संदर्भातील प्रश्न सोडविण्यासाठी विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात येत आहेत.
कोंढाळा ग्रामपंचायती तर्फे काढण्यात आलेल्या शिवार फेरीत ग्रामपंचायत सरपंचा अपर्णा राऊत,उपसरपंच गजानन सेलोटे,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष हरिभाऊ पत्रे, ग्रामपंचायत सदस्य संदीप वाघाडे,सदस्य भूमेश्र्वरी गुरनुले,नलिता वालदे, चौधरी,तलाठी ठाकरे,ग्राम रोजगार सेवक प्रकाश बेदरे,ग्रामपंचायत कर्मचारी प्रदीप तुपट आदी उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आगामी जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय(OBC)समाजाची स्वतंत्रपणे नोंद होण्यासाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी ओबीसी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात संघटनेने देशाचे...

जिल्हा परिषद पदभरती; १९२ उमेदवारांची अंतिम प्रतीक्षा सूची जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील रिक्त असलेली विविध संवर्गांची पदे अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून शैक्षणिक अर्हता व...

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!