Friday, September 4, 2026
Homeभंडाराप्राथमिक आरोग्य केंद्रात गेली अन् बिंग फुटले..! -१७ वर्षीय अल्पवयीन मुलगी सात...

प्राथमिक आरोग्य केंद्रात गेली अन् बिंग फुटले..! -१७ वर्षीय अल्पवयीन मुलगी सात महिन्यांची गर्भवती..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-पत्नीला रात्रीच्या सुमारास पोटदुखीचा त्रास जाणवल्याने पतीने तिला प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.तिथे तपासणीदरम्यान उपस्थित डॉक्टरांनी मुलगी गर्भवती असल्याचे लक्षात येताच तिच्या वयाबाबत पडताळणी केली.पडताळणीत अवघ्या १७ वर्षाची अल्पवयीन मुलगी सात महिन्यांची गर्भवती असल्याचे निष्पन्न झाल्याने अल्पवयीन मुलीचा विवाह करून तिला गर्भवती करणाऱ्या पतीसह कुटुंबीयांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६,लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा २०१२ आणि भारतीय दंड संहितेतील संबंधित कलमांनुसार मोहाडी तालुक्याच्या करडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.विशेष म्हणजे, पीडित मुलगी आणि तिचा पती हे दोघेही अल्पवयीन आहेत.गोपाळ या भटक्या समाजातील पती अक्षय प्रकाश शेंदरे वय १७ वर्षे,रा.खांबा/जांभळी,ता. साकोली,हल्ली मुक्काम नरसिंहटोला,मोहाडी याने अल्पवयीन मुलीसोबत विवाह केला होता.पीडित मुलगी सात महिन्यांची गर्भवती असल्याचे समजताच पोलिसांनी तात्काळ कारवाई केली.या प्रकरणात पीडितेचे आई-वडील प्रल्हाद शालीकराम शिवनकर वय ४० वर्षे,लता प्रल्हाद शिवनकर वय ३५ वर्षे, दोघेही राहणार अर्जुनी-तिरोडा तसेच सासू-सासरे प्रकाश शालीकराम शेंदरे वय ४० वर्षे आणि गिता प्रकाश शेंदरे वय ३६ वर्षे, राहणार खांबा/जांभळी,ता. साकोली यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी पतीला पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

मोहफुलाची दारू नाही; तर पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मोहफुलांचा अवैध मद्यनिर्मितीसाठी होणारा वापर रोखून त्यापासून पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करण्याची सक्षम मूल्यसाखळी जिल्ह्यात उभारावी.महिला बचत गटांना...

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!