उद्रेक न्युज वृत्त :-देशात मतांची चोरी होत असतांना, देशात भ्रष्टाचार फोफावला असतांना,देशात हुकूमशाही माजलेली असतांना,देशाची लोकशाही धोक्यात असतांना,अण्णा तुमच्या सारखा जेष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा? अण्णा,दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर पुन्हा तुमची जादू पाहण्यासाठी देश आतुर आहे.असा मजकूर असलेला बॅनर पुण्यातील पाषाण येथील सामाजिक कार्यकर्ते समीर उत्तरकर यांनी लावले होते.राहुल गांधींच्या आरोपानंतर,निवडणुकांमध्ये मतांची चोरी होत असल्याचा दावा करत,अण्णा हजारे यांनी यावर प्रतिक्रिया द्यावी किंवा आंदोलन करावे,अशी मागणी या बॅनरमधून करण्यात आली होती.त्यावर प्रतिक्रिया देत अण्णा हजारे संतापले आणि तरुणांना चांगलेच धारेवर धरले.त्यांनी म्हटले की,अरे मी दहा कायदे आणले,आता मी ९० वर्षाचा झालो.९० वर्षानंतर देखील मीच करत राहावे आणि तुम्ही झोपून राहावे,ही अपेक्षा चुकीची आहे.अण्णांनी जे केलं ते आपण करावे असे तरुण युवकांना वाटले पाहिजे,देशाचे नागरिक आहेत तर आपले काही कर्तव्य आहे की नाही,अशा शब्दांत अण्णा हजारे यांनी देशातील तरुणांना खडसावले.ते पुढे म्हणाले,१५ ऑगस्टला स्वतंत्र दिवस साजरा केला,नुसता तिरंगा हातात घेऊन,बोट दाखवून काहीही होणार नाही.मी मोठ्या आशेने तरुणाकडे पाहतोय,युवा शक्ती ही राष्ट्र शक्ती आहे.ही जागी झाली तर उद्याच भविष्य दूर नाही.मात्र एवढे वर्ष लढून कायदे करून जेव्हा कानावर येते अण्णांनी जागे झाले पाहिजे तेव्हा वाईट वाटते,अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केली.
अण्णा हजारे संतापले; अरे मी ९० वर्षाचा झालो; सर्वकाही मीच करत राहावे आणि तुम्ही झोपून राहावे..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

