Thursday, April 30, 2026
Homeदेसाईगंजपूरबाधित शेतकरी बांधवांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी….-देसाईगंज भाजपा तालुकाध्यक्ष सुनील पारधी...

पूरबाधित शेतकरी बांधवांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी….-देसाईगंज भाजपा तालुकाध्यक्ष सुनील पारधी यांची मागणी….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

मुख्य संपादक/सत्यवान रामटेके

देसाईगंज(गडचिरोली) :- मागील वर्षाच्या ऑगस्ट ते सप्टेंबर २०२३ मध्ये देसाईगंज तालुक्यासह जिल्ह्यातील काही भागात कृत्रीमरित्या वा नैसर्गिकरित्या आलेल्या महापुरामुळे शेतकरी बांधवांच्या उभ्या असलेल्या धान पिकांची तसेच इतर साहित्यांची विल्हेवाट लागून अतोनात नुकसान झाले होते.अशातच गेल्या सात महिन्यांचा कालावधी लोटूनही जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या ४ कोटी रकमेचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आले असून पाठविण्यात आलेले प्रस्ताव प्रलंबित असल्याने पूरबाधित शेतकरी बांधवांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी; अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे देसाईगंज तालुकाध्यक्ष सुनीलभाऊ पारधी यांनी केली आहे.

भारतीय जनता पक्षाचे देसाईगंज तालुकाध्यक्ष सुनीलभाऊ पारधी यांची शेतकरी बांधवांच्या प्रती कळकळ लक्षात घेता; त्यांनी म्हटले आहे की,माझ्या शेतकरी बांधवांवर अन्याय वा कुणालाही त्रास होता कामा नये; जगाचा पोशिंदा म्हटल्या जाणाऱ्या शेतकरी बांधवांनी शेती करणे सोडले तर तुम्ही-आम्ही जगूच शकणार नाही? त्यांच्याच भरवशावर आम्ही असल्याने राब-राब जीवाचे रान करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेता; सर्वप्रथम त्यांची नुकसान भरपाई मंजूर करणे आवश्यक आहे.सात महिन्यांचा कालावधी लोटूनही नुकसान भरपाई मंजूर न करणे ही शोकांतिका आहे.गडचिरोली जिल्हा आदिवासी,बहुल,अतिदुर्गम तसेच नक्षल प्रभावित आहे.अशातही जिल्ह्यातील ७० ते ७५ टक्के जनता ही धान्य पीक लागवड करीत असतात.शेतकरी बांधवांचे नशीब जरी फाटके असतील तरीही त्यांच्या समस्या सर्वात अगोदर सोडविणे हे आमचे आद्य कर्तव्य आहे.यासाठी देसाईगंज तालुक्यासह जिल्ह्यातील पूरबाधित शेतकरी बांधवांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी; अशीही मागणी भारतीय जनता पक्षाचे देसाईगंज तालुकाध्यक्ष सुनीलभाऊ पारधी यांनी केली आहे.त्याच बरोबर शासनास याबाबत अवगत करून तात्काळ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर करण्याची हमी त्यांनी उद्रेक न्युज वृत्ताला दिली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; चंद्रपूर पोलिस अधीक्षक पदाची सूत्रे आता आयुष नोपानी यांच्याकडे..

उद्रेक न्युज वृत्त :-ऐन महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्यातील तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या(भारतीय पोलीस सेवा)बदल्या करण्यात आल्या आहेत.यात चंद्रपूरचे विद्यमान...

“आपण लोकांची कामे करण्यासाठी बसलो आहोत; अडवणूक करण्यासाठी नाही”.. -सहपालकमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण मॅपिंग करून शासनाने स्वतः त्यांच्या दारात जाऊन गरजेनुसार योजनांचा लाभ द्यावा,अशी भूमिका कृषी राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष...

अखेर कुरखेडा नगरपंचायत सफाई कामगारांच्या बेमुदत संपावर तोडगा; संप मागे..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा नगरपंचायत अंतर्गत कार्यरत सफाई कामगारांंनी थकीत वेतनाकरीता मागील २३ एप्रीलपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले होते.त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण...

कायदा हा लवचिक आणि बदलत्या काळाशी सुसंगत असावा- सर्वोच्च न्यायालय – गर्भपाताची परवानगी दिली नाही; तर पीडितेच्या मनावर आयुष्यभर न पुसली जाणारी जखम आणि...

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच २४ एप्रिल २०२६ रोजी न्यायमूर्ती बी.व्ही.नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने एका १५ वर्षीय बलात्कार पिडीत तरुणीला ३० आठवड्यांचा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!