Friday, October 16, 2026
Homeनागपूर२६ वर्षाच्या युवकाने गळफास घेऊन केली आत्महत्या…-प्रेयसी घरी न आल्याचे कारण…..

२६ वर्षाच्या युवकाने गळफास घेऊन केली आत्महत्या…-प्रेयसी घरी न आल्याचे कारण…..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :- लिव्ह इनमध्ये सोबत राहणारी प्रेयसी खोलीवर न आल्यामुळे एका २६ वर्षांच्या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली.ही घटना वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत काल,बुधवारी घडली.

निखिल रामेश्वर बुराडे वय २६ वर्षे,रा.अनमोलनगर, नागपूर असे गळफास घेतलेल्या प्रियकराचे नाव आहे. तो मोबाइल शॉपीत कामाला होता.माहितीनुसार निखिलचे स्वागतनगरमध्ये वडिलोपार्जित घर आहे. तेथे त्याचे आईवडील,बहीण आणि मोठा भाऊ राहतो. परंतु मागील २५ दिवसांपासून निखिल एका युवतीसोबत अनमोलनगरात किरायाची खोली घेऊन लिव्ह इनमध्ये राहत होता.ही युवती एका राजकीय पदाधिकाऱ्याच्या कार्यालयात काम करते.परंतु मागील दोन दिवसांपासून लिव्ह इनमध्ये राहणारी प्रेयसी घरी न आल्यामुळे निखिल संतापला होता.यातच त्याने राहत्या खोलीत छताच्या लोखंडी हुकला नायलॉन दोरी बांधून गळफास घेतला.या प्रकरणी रंजना सुनील वारकी वय २३ वर्षे, रा.धरमपेठ यांनी दिलेल्या सूचनेवरून वाठोडा ठाण्याचे उपनिरीक्षक विनोद वंदे यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू,तिघेजण जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  नांदेड :-जिल्ह्याच्या माहूर तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे.माहूर तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये डोंगरावर वसलेल्या रेणुका मातेच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या टेम्पोचा माहूर...

देसाईगंजच्या आदर्श महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणासोबतच व्यावसायिक ज्ञान,कौशल्ये आणि स्वयंरोजगाराच्या संधींची माहिती मिळावी,या उद्देशाने आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथील वाणिज्य व व्यवस्थापन विभागांतर्गत...

आता तीन कल्याणकारी योजनांना इंदिरा गांधींच्या नावाऐवजी ‘प्रधानमंत्री’ शब्द..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली.या पार पडलेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने तीन कल्याणकारी योजनांची नावे...

गडचिरोली जिल्ह्यातील ९६ रेतीघाटांचे होणार लिलाव; सूचना व हरकती सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील वाळू व रेती उत्खननासाठी योग्य स्थळांचा समावेश असलेला सन २०२६-२७ चा प्रारूप जिल्हा सर्वेक्षण अहवाल नागरिकांच्या अवलोकनासाठी www.gadchiroli.gov.in या संकेतस्थळावर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!