Wednesday, June 10, 2026
Homeनागपूरजिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल सहाय्यक अडकला एसीबीच्या जाळ्यात.. - ५ लाख रुपये घेतांना...

जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल सहाय्यक अडकला एसीबीच्या जाळ्यात.. – ५ लाख रुपये घेतांना रंगेहाथ अटक..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सहाय्यक पदावर कार्यरत असणाऱ्या एका लाचखोर अधिकाऱ्याने बांधकामाशी संबंधित अपील प्रकरण निकाली काढण्यासाठी तब्बल ५ लाख रुपयांची मागणी केली.प्रकरणी काल शुक्रवारच्या रात्री उशिरा पर्यंत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून
नंदनवन परिसरात लाच घेतांना रंगेहाथ अटक केली. नरेश साधूरावजी बर्वे वय ५४ वर्षे,असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे.
प्रकरणातील तक्रारदार यांचे शिवाजीनगर,महाल येथील नझुल प्लॉटवरील बांधकामासंदर्भातील अपील अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयात प्रलंबित होते.ते निकाली काढण्यासाठी बर्वे यांनी ५ लाख रुपयांची मागणी केली होती.दरम्यान,१७ एप्रिल व २० एप्रिलला नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाला पडताळणीत आरोपी लाच मागत असल्याचे दिसून आले.त्यानंतर,पथकाने सापळा रचला.त्यानुसार,काल शुक्रवारच्या रात्री ११:३० वाजेच्या सुमारास तक्रारदाराकडून पंचासमक्ष नरेश बर्वे यांनी ५ लाखांची रक्कम स्वीकारताच पथकाने त्यांना पकडले.अंगझडतीत ५ लाख रुपये जप्त करण्यात आले.या प्रकरणी नंदनवन पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस निरीक्षक विवेक पडघान करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दुर्गम गडचिरोलीतील तब्बल ७८ विद्यार्थ्यांना देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुर्गम,नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात आलेला ‘मिशन-२००’ हा उपक्रम...

अखेर नदीत बुडालेल्या तीन तरुणांचे सापडले मृतदेह; उर्वरित दोन युवकांचा शोध सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या घुग्गुस शहरातील पाच तरुण म्हातारदेवी परिसरातील वर्धा नदीवर पोहण्यासाठी गेले असता काल सोमवारच्या रात्री उशिरापर्यंत घरी परतले नसल्याने नदीत बुडाल्याची भीती...

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना झटका.. आता नऊ सिलेंडरवर नाही; तर चारच सिलेंडरवर मिळणार अनुदान..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या दरात रविवार ७ जून २०२६ पासून २९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.त्यानुसार, बऱ्याचश्या जिल्ह्यांमध्ये गॅस सिलेंडरच्या किंमतींनी...

कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी आधार पडताळणी करणे आवश्यक..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील अनेक शेतकरी गेल्या काही वर्षापासून नैसर्गिक आपत्ती,अवकाळी पाऊस, उत्पादन खर्चातील वाढ आणि शेतमालाला न मिळणारा योग्य भाव,यामुळे आर्थिक संकटाचा सामना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!