Friday, August 28, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआई-वडिलाचा खतरनाक कारनामा..! मुलीकडे कुणीही वाईट नजरेने पाहू नये,यासाठी मुलीचे केले टक्कल..

आई-वडिलाचा खतरनाक कारनामा..! मुलीकडे कुणीही वाईट नजरेने पाहू नये,यासाठी मुलीचे केले टक्कल..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यात अल्पवयीन मुलींवरील वाढते अत्याचार,अपहरण,एखाद्या सोबत पळून जाणे व प्रेम-प्रकरणाच्या घटना मोठ्या प्रमाणात उघडकीस येऊ लागल्या आहेत.यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.अश्याच प्रकारे चिंतातुर झालेल्या पालकांनी आपली मुलगी सुरक्षित राहावी,तिच्यावर कुणाचीही वाईट नजर पडू नये तसेच मुलीच्या सौंदर्यामुळे कोणी तिच्याकडे आकर्षित होऊ नये म्हणून चक्क जन्मदात्या आई-वडिलांनीच आपल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे डोक्यावरील संपूर्ण केस कापून तिला टकली बनवल्याची घटना अमरावती जिल्ह्याच्या वरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.आई-वडील एवढ्यावरच थांबले नाहीत,तर तिला घरातही डांबून ठेवले.प्रकरणी वरूड पोलीस ठाण्यात पालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विशेष म्हणजे, मुलीच्या पालकांना एक तरुण मुलीचा पाठलाग करत असल्याचा संशय होता.
१६ वर्षीय अल्पवयीन मुलगी शिक्षण घेत असून आई-वडिलांसोबत राहते.मुलगी दिसायला सुंदर असल्याने तिच्यावर कुणाचीही वाईट नजर पडू नये म्हणून पालकांनी अत्यंत टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला.तत्पूर्वी,एका तरुणाकडून मुलीचा पाठलाग होत असल्याचा संशय पालकांना होता.त्यामुळे त्यांनी त्या तरुणाविरुद्ध पोलिसांत तक्रार देण्यासाठी मुलीवर दबाव टाकला होता.मात्र,मुलीने तक्रार देण्यास नकार दिला. त्यानंतर,त्यांनी घरातच ट्रिमरच्या साहाय्याने मुलीचे केस कापून टक्कल केले.एवढेच नव्हे,तर तिला मारहाण करून घरातच बंदिस्त ठेवल्याचेही समोर आले आहे. यामुळे मुलगी मानसिक तणावात जाऊन घाबरली. घाबरलेल्या मुलीने धैर्य दाखवत थेट वरूड पोलीस ठाणे गाठले आणि घडलेली सर्व कैफियत पोलिसांना सांगितली.पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मुलीला बाल कल्याण समितीसमोर हजर केले.समितीसमोर मुलीने आपली कैफियत मांडल्यानंतर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता वरूड पोलिसांनी आई-वडिलांविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला.दरम्यान,पीडित मुलीने पालकांसोबत राहण्यास नकार दिला आहे.विशेष म्हणजे,पालकांनी मुलीचे भवितव्य वा काळजी म्हणून सदरचे कृत्य जरी केले असले,तरी सदरची पद्धत अत्यंत निंदनीय असल्याच्या प्रतिक्रया विविध स्तरातून उमटू लागल्या आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

किरण चौधरी “मनस्विनी साहित्यरत्न पुरस्कारा”ने सन्मानित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दैनिक देशोन्नती "मनस्विनी साहित्यरत्न पुरस्कार" व दैनिक देशोन्नतीच्या ‘मनस्विनी’ सदरातून आपल्या लेखणीची स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या गडचिरोलीतील किरण महादेव चौधरी यांच्या ‘लेखमंजिरी’...

आलापल्ली-सिरोंचा महामार्गावर प्रवास करून जिल्हाधिकाऱ्यांकडून कामांची प्रत्यक्ष पाहणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला गती देण्यासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी या मार्गावर प्रत्यक्ष प्रवास करून सुरू असलेल्या कामांची पाहणी केली.महामार्गावरील उर्वरित...

नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी संपर्क क्रमांक व ऑनलाइन नोंदणी लिंक जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटकांनी अथवा त्यांच्याशी संपर्क...

विजेचा जोरदार धक्का लागल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-शेतशिवारातील विद्युत वाहिनीतील तांत्रिक बिघाड दूर करत असतांनाच अचानकपणे विजेचा जोरदार धक्का लागून विद्युत वितरण कंपनीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!