उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :- समुपदेशन केंद्रावर चर्चा करण्यासाठी आलेल्या पत्नीवर पतीने चक्क ब्लेडने वार करत गंभीर जखमी केल्याची घटना भंडारा जिल्ह्यात घडली आहे.पत्नीने पतीसोबत त्याच्या घरी जाण्यास नकाराने दिल्याने पतीने हे भयंकर कृत्य केले.सदर घटनेत पत्नी गंभीर जखमी झाली असून तिला भंडारा येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.तर आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे. ग्राम खांबा जांभळी येथील अश्विनकुमार मेश्राम आणि त्याची पत्नी टिकेश्वरी २२ वर्षे या दोघा पती-पत्नीमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद सुरू होता.अनेकदा भांडण विकोपाला जायचे. यामुळे पत्नीने या त्रासाला कंटाळून पोलिसात तक्रार दाखल केली होती.याप्रकरणी दोघांना चर्चा करण्यासाठी अभय समुपदेशन केंद्र,साकोली येथे बोलवण्यात आले होते.
सुनावणीदरम्यान पती अश्विन हा पत्नी टिकेश्वरीला घरी नेण्यासाठी तयार होता.मात्र,पत्नीने जाण्यास नकार दिला.यामुळे वाद वाढला आणि रागाच्या भरात अश्विनने टिकेश्वरीच्या गळ्यावर धारदार ब्लेडने वार केला.यात पत्नी गंभीर जखमी झाली.तिला भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले असून,पुढील उपचार सुरू आहेत.पती अश्विन मेश्राम याला पोलिसांनी अटक करून कलम ३०७ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला आहे.