Sunday, September 6, 2026
Homeचंद्रपूरधान निंदणी करतांनाच वाघाने नेले उचलून; महिला ठार..

धान निंदणी करतांनाच वाघाने नेले उचलून; महिला ठार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-नुकतेच दोन दिवसांपूर्वी म्हणजेच मंगळवार १६ सप्टेंबरला ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्रातील सायगाटा भागातील लाखापूरच्या जंगलात गुरे चारण्यासाठी गेलेल्या लाखापूर येथील सुनील उर्फ प्रमोद बाळकृष्ण राऊत या गुराख्याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता.अश्यातच आता आज,गुरुवार १८ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास शेतातील धान निंदणी करणाऱ्या एका ४० वर्षीय महिलेस वाघाने उचलून नेत ठार केल्याची घटना चिमूर तालुक्याच्या लावारी गावात उघडकीस आली.प्रकरणी गावकऱ्यांनी संताप व्यक्त करत वनविभागाच्या वाहनांना घेराव घातल्याने काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. विद्या कैलास मसराम वय ४० वर्षे,रा.लावारी, ता.चिमूर असे वाघाने ठार केलेल्या महिलेचे नाव आहे.
चिमूर तालुक्याच्या शंकरपूरपासून अवघ्या सहा
किलोमीटर अंतरावर असलेल्या लावारी गावातील कैलास मसराम यांच्या शेतात त्यांची पत्नी विद्या व काही महीलांद्वारे आज गुरुवारी धान निंदणीचे काम सुरू होते.काही महिला समोरच्या बांधीत होत्या,तर विद्या मसराम ह्या मागील बांधीत निंदण करत होत्या.निंदण करत असतांनाच वाघाने अचानकपणे त्यांच्यावर झडप घालून ठार केले व दूरवर उचलून नेले.सदरची घटना समोरच्या बांधीत निंदण करत असलेल्या महिलांच्या जराही लक्षात आली नाही. महिलांनी विद्या मसराम यांना आवाज दिला असता कुठलाही प्रतिसाद मिळाला नसल्याने त्यांनी काहीकाळ शोधाशोध केली.काही वेळातच विद्या मसराम यांचे पती शेतावर पोहचले असता महिलांनी आपबिती सांगितली.त्यानुसार कैलास मसराम यांनी शोधाशोध केली असता काही अंतरावर पत्नी मृतावस्थेत आढळून आल्याने सदरची घटना उघडकीस आली.घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच परिसरातील शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत वनविभागास माहिती दिली.वन विभागाने मृतदेह चिमूर ग्रामीण रुग्णालयात पाठविला.त्यानंतर गावकऱ्यांनी रस्त्यावर एकत्र येत घटनेचा निषेध नोंदवत संताप व्यक्त केला.त्यामुळे घटनास्थळी काहीकाळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर ठोसरे, भिसीचे ठाणेदार मंगेश भोंगडे आदी अधिकाऱ्यांनी मध्यस्थी केल्याने नागरिक शांत झाले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

तलावात मासे पकडत असतांनाच पाय घसरल्याने तलावात पडला; चिमुकल्याचा तलावात बुडून मृत्यू.. -दुसऱ्या घटनेत भारतीय सैन्य दलातील जवानाचा पाण्यात बुडून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील निलज गावातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. शाळेला सुट्टी असल्याने मित्रांसोबत गाव नजीकच्या तलावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या...

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!