Sunday, September 6, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तराज्यातील निवडणुका होणार लागोपाठ; हिवाळी अधिवेशनातील घोषणांचा पाऊस थांबणार..

राज्यातील निवडणुका होणार लागोपाठ; हिवाळी अधिवेशनातील घोषणांचा पाऊस थांबणार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील रखडलेल्या २९ महापालिका,२४७ नगरपालिका,१४७ नगर पंचायती,३४ जिल्हा परिषद आणि ३५१ पंचायत समितीच्या निवडणुका पुढील वर्षी ३१ जानेवारीच्या आत घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने १६ सप्टेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची लेखी प्रत अद्याप आयोगाला प्राप्त झालेली नाही.तथापि,न्यायालयाचे निर्देश लक्षात घेता आयोगाकडून तीन टप्प्यांत निवडणुका घेण्याची तयारी सुरू आहे.राज्यात पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होतील. दुसऱ्या टप्प्यात नगरपालिका आणि नगर पंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला जाईल,तर शेवटच्या टप्प्यात २९ महापालिकांच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. निवडणूक कार्यक्रमाची माहिती आयोगाकडून राज्य सरकारला दिली जाईल.तीन टप्प्यातील निवडणुकांमुळे राज्यात नोव्हेंबर ते जानेवारीदरम्यान निवडणूक आचारसंहिता लागू राहण्याची शक्यता आहे.अर्थात ही निवडणूक आचारसंहिता संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था क्षेत्रापुरती लागू असणार आहे.पण,तरीही त्याचा परिणाम नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर होण्याची चिन्हे आहेत.काही भागातील आचारसंहितेमुळे अधिवेशनात सरकारला फार मोठ्या लोकप्रिय घोषणा करता येणार नाहीत.विशेष म्हणजे,नागपूरचे हिवाळी अधिवेशन येत्या ८ डिसेंबर रोजी सुरू होणार आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनातील घोषणांचा पाऊस थांबण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

तलावात मासे पकडत असतांनाच पाय घसरल्याने तलावात पडला; चिमुकल्याचा तलावात बुडून मृत्यू.. -दुसऱ्या घटनेत भारतीय सैन्य दलातील जवानाचा पाण्यात बुडून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील निलज गावातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. शाळेला सुट्टी असल्याने मित्रांसोबत गाव नजीकच्या तलावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या...

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!