- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यात देहव्यापार प्रकरणी आज,गुरुवार १८ सप्टेंबर रोजी दहशतवाद विरोधी शाखेच्या(एटीएस)पथकाने कारवाई करीत दोघांच्या मुसक्या आवळल्या.भारत सुखदेव कोल्हाडकर वय ३६ वर्षे,रा.शिवाजी वार्ड,तुमसर,जि.भंडारा व वैभव अनिरुद्ध बोरकर वय ४० वर्षे, रा.आंबेडकर वार्ड,तुमसर, जि.भंडारा असे अटकेतील आरोपींची नावे असून दोघेही मिळून मेहेगाव येथे बांधकाम सुरू असलेल्या एका घरात देहव्यापरचा अड्डा चालवत होते.प्रकरणी आरोपींना अटक करून त्यांच्यावर अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५६ कलम ३,४,५,अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भंडाऱ्याच्या एटीएस पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सदरची धाड टाकण्यात आली. सर्वप्रथम डमी ग्राहक पाठवून खात्री करण्यात आली. आरोपी भारत कोल्हाडकर आणि वैभव बोरकर
हे दोघे महिला पुरवत होते आणि ग्राहकांकडून पैसे घेत होते.पुराव्यांची खात्री पटल्यानंतर,पोलिस पथकाने पंचांसमक्ष त्या घरात छापा टाकला.छाप्यात पोलिसांनी देहव्यापारासाठी वापरले जाणारे साहित्य आणि रोख रक्कम जप्त केली.तसेच,या अड्ड्यामध्ये सापडलेल्या एका महिलेची सुटका करण्यात आली.दोघे आर्थिक फायद्यासाठी महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांना देहव्यापारात ढकलत होते.
- Advertisement -

