Thursday, June 4, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज लोक न्यायालयात १२ प्रकरणांचा निपटारा..-आपसी तडजोडीतुन ६ लाख २२ हजार रुपये...

देसाईगंज लोक न्यायालयात १२ प्रकरणांचा निपटारा..-आपसी तडजोडीतुन ६ लाख २२ हजार रुपये वसुल

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज(गडचिरोली) :-जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोली,देसाईगंज तालुका विधी सेवा समिती तसेच तालुका अधिवक्ता संघाच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक- ९ डिसेंबर रोजी आयोजीत लोक न्यायालयात १२ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला असुन दरम्यान आपसी तडजोडीतुन तब्बल ६ लाख २२ हजार १८८ रुपये वसुल करण्यात आले. 

देसाईगंज येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधिश तथा पॅनल प्रमुख एन.डी.मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या लोक न्यायालयात दिवाणी व फौजदारी ७० प्रकरणे,दाखलपुर्व १ हजार ९० असे एकुण १ हजार १६६ मामले आपसी तडजोडी करीता ठेवण्यात आले होते.सदर मामल्यापैकी दाखलपुर्व १२ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला.तसेच बँक,ग्रामपंचायत, महावितरण कंपनिचे १ हजार ९० प्रकरणे आपसी तडजोडी करीता ठेवण्यात आले होते.

दरम्यान लोक न्यायालयाचे अध्यक्ष तथा न्यायाधीश एन.डी.मेश्राम आपल्या मार्गदर्शनपर भाषणात म्हणाले की,पक्षकारांनी आपसी तडजोडीतुन प्रकरण निकाली काढल्यास वेळ व पैशाची बचत होते.आपसी समझोत्यामुळे दुरावलेले संबंध देखील नात्यात परावर्तित होऊ शकतात.काळाची पावले ओळखून अनितीच्या मार्गाने न जाता नैतीकता,धैर्य आणि सहनशीलता बाळगल्यास सुदृढ समाजाची निर्मिती शक्य आहे.यास्तव सर्वांनी सहकार्याची भुमिका ठेऊन नागरिकांनी जबाबदारी पुर्वक कर्तव्य पार पाडणे गरजे असल्याचे म्हणाले.

यावेळी मार्गदर्शन करताना जेष्ठ अधिवक्ता संजय गुरु म्हणाले की,समाजाचे भवितव्य विद्यमान पिढीवर अवलंबून आहे.विद्यमान पिढी सुसंस्कृत घडवणे ही प्रत्येकाची नैतीक जबाबदारी आहे.आपापली जबाबदारी ओळखून जबाबदारी यथायोग्य पार पाडल्यास निश्चितच सुसंस्कृत समाजाची निर्मिती शक्य आहे.करीता सर्वांनी यथायोग्य जबाबदारी पार पाडणे गरजे असल्याचे त्यांनी सांगितले. 

देसाईगंज न्यायालयाच्या सभागृहात आयोजीत लोक न्यायालयात अधिवक्ता ज्युईली मेश्राम,ॲड.दत्ताभाऊ पिलारे यांनी काम पाहीले.लोक न्यायालयाच्या यशस्वीतेकरीता ॲड.नेहा इलमुलवार व सर्व कार्यालयीन कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.सदर लोक न्यायालयास पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

डिझेलचा टँकर पलटी होताच इंधन नेण्यासाठी लोकांची झुंबड..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-आधीच इंधन कमतरतेमुळे पेट्रोल पंपावर गर्दी होतांना दिसून येते.अश्यातच एखाद्या घटनेत चक्क इंधनाचा टँकर पलटी होऊन डिझेलचा महापूर होत असल्याची बाब...

तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवरील ‘शेतकरी योजना’ या उपक्रमांतर्गत कडधान्य आत्मनिर्भरता अभियान सन २०२६-२७ अंतर्गत तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी...

गोदाम बांधकाम,तेल काढणी युनिट,कडधान्य प्रक्रिया व पॅकेजिंग युनिटसाठी लाखो रुपयांपर्यंत अनुदान.. – बना स्वतःच मालक; ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील भुईमूग,करडई,तीळ यांसारख्या तेलबिया पिकांचे तसेच तूर,हरभरा व इतर कडधान्यांचे उत्पादन वाढविण्यासोबतच त्यांचे मूल्यवर्धन आणि शेतकऱ्यांना अधिक आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी...

शाळेची पहिली घंटा वाजणार ‘या’ दिवशी..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील वाढती उष्णता लक्षात घेता यंदा शाळेची पहिली घंटा उशिरा सुरू होण्याच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला असून यंदा २०२६-२७ या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!