Thursday, June 4, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तदर चौथा मुलगा वाचनासोबतच गणित आणि विज्ञानातही कमकुवत…

दर चौथा मुलगा वाचनासोबतच गणित आणि विज्ञानातही कमकुवत…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- कोरोनाचा उल्लेख होताच हृदयात भीती आणि अंगाचा थरकाप उडतो.कोरोना व्हायरसमुळे लाखो कुटुंबे उद्धवस्त झाली आहेत.जगात क्वचितच असा कोणताही भाग असेल जिथे कोरोनाने कहर केला नसेल.असे कोणतेही कुटुंब नसेल ज्याने आपले प्रियजन किंवा नातेवाईक गमावले नसतील.आताही कोरोना विषाणूच्या प्रकारांविषयी माहिती येतच असते.कोरोनामधून बरे झालेले लोक वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांबद्दल बोलतात.त्यामुळे मुलांच्या शिक्षणावरही परिणाम झाला.ओईसीडीने (Organisation for Economic Co-operation and Development) ही जगातील ३७ देशांचा सहभाग असलेली एक आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकारी संघटना आहे.सदर संघटनेने शिक्षणाबाबत आश्चर्यकारक अहवाल समोर आणला आहे. कोरोनामुळे दर चौथा मुलगा वाचनासोबतच गणित आणि विज्ञानातही कमकुवत झाला आहे.इथे तुमच्या मनात प्रश्न निर्माण होत असतील की कोरोना विषाणूचा मुलांच्या मेंदूवर परिणाम झाला आहे की, आणखी काही कारण आहे.ओईसीडीनुसार, कोरोनाच्या काळात शिक्षणाचा पॅटर्न बदलला. ऑफलाईन क्लासेसऐवजी ऑनलाईन क्लासेसचा पर्याय म्हणून प्रयत्न करण्यात आले.ऑनलाइन वर्गामुळे अभ्यास सुकर होण्यास मदत झाली.पण त्याचा परिणाम मुलांच्या वाचनाच्या सवयीवर झाला. यासोबतच शिक्षकांशी थेट संपर्क नसल्यामुळे विज्ञान, गणित हे विषय मुलांना अवघड जाऊ लागले.

७ लाख मुलांवर अभ्यासाचा दावा २०१८ च्या तुलनेत पॅरिसस्थित संस्थेला असे आढळून आले की वाचनाची सवय १० गुणांनी कमी झाली आणि गणिताचा अभ्यास करण्याची सवय १५ गुणांनी कमी झाली.जे विद्यार्थी वर्षभरात बरेच काही शिकत होते.आता ते जास्त वेळ घेत आहेत.मुलांना गणिताचे प्रश्न लवकर सोडवता येत नाहीत.हा अहवाल तयार करण्यासाठी पीआयएसए चाचणी घेण्यात आली.ज्यामध्ये ८१ देशांतील सुमारे ७ लाख मुलांचा सहभाग असल्याचा दावा करण्यात आला होता.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

डिझेलचा टँकर पलटी होताच इंधन नेण्यासाठी लोकांची झुंबड..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-आधीच इंधन कमतरतेमुळे पेट्रोल पंपावर गर्दी होतांना दिसून येते.अश्यातच एखाद्या घटनेत चक्क इंधनाचा टँकर पलटी होऊन डिझेलचा महापूर होत असल्याची बाब...

तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवरील ‘शेतकरी योजना’ या उपक्रमांतर्गत कडधान्य आत्मनिर्भरता अभियान सन २०२६-२७ अंतर्गत तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी...

गोदाम बांधकाम,तेल काढणी युनिट,कडधान्य प्रक्रिया व पॅकेजिंग युनिटसाठी लाखो रुपयांपर्यंत अनुदान.. – बना स्वतःच मालक; ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील भुईमूग,करडई,तीळ यांसारख्या तेलबिया पिकांचे तसेच तूर,हरभरा व इतर कडधान्यांचे उत्पादन वाढविण्यासोबतच त्यांचे मूल्यवर्धन आणि शेतकऱ्यांना अधिक आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी...

शाळेची पहिली घंटा वाजणार ‘या’ दिवशी..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील वाढती उष्णता लक्षात घेता यंदा शाळेची पहिली घंटा उशिरा सुरू होण्याच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला असून यंदा २०२६-२७ या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!