उद्रेक न्युज वृत्त
संपादक/सत्यवान रामटेके
देसाईगंज :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे देसाईगंज तालुकाध्यक्ष क्षितिजभाऊ उके यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक स्थानिक सार्वजनिक बांधकाम विश्राम गृह येथे पार पडली.
सदर बैठकीमध्ये खालील विषयांवर चर्चा करून ठराव मंजूर करण्यात आले.
१) उद्या ३० जून ला पक्षाच्या नवनियुक्त कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया ताई सुळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्याने विविध कार्यक्रम घेण्याचे ठरविण्यात आले.
२) गडचिरोली-चिमूर लोकसभा सीट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार धर्मरावबाबा यांना देण्यात यावी; असे ठराव घेण्यात आले तसेच यासंबधी वरिष्ठांना पाठपुरावा करण्यात येणार आहे.
३)देसाईगंज येथील स्थानिक जनसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने येणाऱ्या काळात मोठे आंदोलन करण्याचे ठरविण्यात आले.या विषयी चर्चा करण्याकरिता तसेच आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यासाठी दिनांक ३० जून ला महाविकास आघाडी ची बैठक घेण्याचे ठरविण्यात आले.
सदर बैठकीला जिल्हा सचिव विलास गोटेफोडे, तालुकाध्यक्ष क्षितिज उके, शहराध्यक्ष लतीफभाई शेख,सामाजिक न्याय विभागचे जिल्हा सचिव हंसराज लांडगे,जेष्ठ नेते डाकराम वाघमारे,महिला जिल्हा उपाध्यक्षा वनमाला पुसतोडे,महिला शहराध्यक्षा नजमा पठाण,युवक तालुकाध्यक्ष चिराग भागडकर, युवक शहराध्यक्ष इम्रान शेख,तालुका उपाध्यक्ष रोशन शेंडे,शहर संघटक सचिव नामदेव मेश्राम,रामभाऊ साखरे,कला व सांस्कृतिक विभागचे जिल्हाध्यक्ष भुवन लिल्हारे,अशोक माडावर,सुरेश खोब्रागडे,सत्यवान रामटेके इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.