Sunday, July 12, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज धम्म वसुंधरा विपश्यना केंद्राच्या वतीने माजी आमदार कृष्णा गजबे यांचा सत्कार..

देसाईगंज धम्म वसुंधरा विपश्यना केंद्राच्या वतीने माजी आमदार कृष्णा गजबे यांचा सत्कार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-जगाला शांती,करुणा मैत्री व अहिंसेची शिकवण देणाऱ्या तथागत गौतम बुद्धांनी दु:ख मुक्तिचा मार्ग म्हणून विपश्यना ध्यानसाधनेची शिकवण दिली.या ध्यानसाधनेचे केंन्द्र देसाईगंज येथील धम्मवसुंधरा असुन आपल्या आमदारकीच्या कार्यकाळात या केंद्राकडे जाण्याचा मार्ग सुकर व्हावा, यासाठी २० लक्ष रुपयाचा निधी उपलब्ध करुन मार्ग तयार करुन दिला.त्या ऋणाची परतफेड म्हणून आज,सोमवार ३१ मार्च रोजी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार कृष्णा गजबे यांचा देसाईगंज धम्म वसुंधरा विपश्यना केंद्राच्या वतीने शाल,पुष्पगुच्छ व बुद्धमुर्ती भेट देऊन सत्कार करण्यात आला.      देसाईगंज येथे धम्म वसुंधरा विपश्यना ध्यानसाधना केंन्द्र हे निसर्गरम्य वातावरणात तयार केलेले असुन, या केंद्राकडे जाण्याचा मार्ग उपलब्ध नसल्यामुळे शिबिराला जाण्यासाठी साधकांना पावसाळ्याच्या दिवसात चिखलातुन व खालखोल खड्ड्यातून जावे लागत होते.पर्याय नसल्याने काही कालावधीसाठी ध्यानसाधनेचे शिबिर बंद ठेवावे लागत होते.साधना केंद्र परिसर हा शेतशिवारयुक्त व वनहक्काचा असल्याने त्याठिकाणी शासकिय योजनेतुन रस्ता निर्माण करणे अडचणीचे असल्याने साधकांची अडचण लक्षात घेत तत्कालीन आमदार कृष्णा गजबे यांनी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करुन मार्ग तयार करण्याची मंजुरी घेऊन २० लक्ष रुपयांचा निधी देसाईगंज नगरपरिषदेला उपलब्ध करुन दिला होता.त्यानुसार नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ.कुलभूषण रामटेके यांनी निविदा प्रक्रिया पुर्ण करुन रस्ता बांधकाम पुर्ण करुन दिला होता.रस्ता तयार झाल्यामुळे विपश्यना साधनेसाठी जाणाऱ्या साधकांना तसेच १० दिवसिय विपश्यना शिबिराचा मार्गही सुकर झाला.त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज सोमवारी देसाईगंज धम्म वसुंधरा विपश्यना साधना केंद्राच्या वतीने माजी आमदार कृष्णा गजबे यांचा सत्कार करण्यात आला.सत्कार करतेवेळी समितीचे राजरतन मेश्राम, पुरुषोत्तम दुधे,जयदेव मानकर,रुपेश सुखदेवे, कुषाबराव लोणारे,रमेश घुटके,चंदु राऊत,देशमुख चिंतलअम्मा, डॉ.वंदना धोंगडे यांचेसह साधक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त; दोन आरोपींना अटक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-शांतीनगर पोलिस ठाणे हद्दीत नागपूर गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त करून दोन आरोपींच्या मुसक्या...

सिंदेवाहीत माकडांची दहशत कायम; दोन दिवसांत दोन जणांवर हल्ले,नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-सिंदेवाही शहरात माकडांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढतच चालला असून दोन दिवसांत दोन नागरिकांवर हल्ले झाल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे वनविभागाने...

राज्यात ‘किलकारी’ उपक्रमात वर्धा पहिल्या,चंद्रपूर दुसऱ्या,वाशीम तिसऱ्या तर गडचिरोली चौथ्या स्थानावर..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयांतर्गत गरोदर माता,माता आणि बालकांच्या आरोग्याविषयी डिजिटल साक्षरता व जनजागृती करणाऱ्या ‘किलकारी’(Kilkari Mobile Audio Services)उपक्रमात...

वाघाच्या हल्ल्यात गुराखी गंभीर जखमी; वाघाची पाठीमागून झडप..

उद्रेक न्युज वृत्त  नागभीड(चंद्रपूर):-गावाजवळच्या परिसरात गुरे चारण्यासाठी गेलेल्या एका गुराख्यावर वाघाने प्राणघातक हल्ला चढवून गुराख्यास गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना आज,रविवार १२ जुलै रोजी दुपारी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!