Friday, October 16, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज तालुक्यातील ग्रामीण भागातील रुग्णांसाठी वर्षभर मिळणार मोफत तपासणी सुविधा...- बनसोड हॉस्पिटल देसाईगंज,...

देसाईगंज तालुक्यातील ग्रामीण भागातील रुग्णांसाठी वर्षभर मिळणार मोफत तपासणी सुविधा…- बनसोड हॉस्पिटल देसाईगंज, डॉ.श्रीकांत बनसोड यांचे उपक्रम

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज :- तालुक्यातील ग्रामीण भागातील रुग्णांसाठी बनसोड हॉस्पिटलचे संचालक डॉ.श्रीकांत बनसोड यांनी पुन्हा एकदा गोरगरीब नागरिकांसाठी आरोग्य सुविधेच्या माध्यमातून नवा उपक्रम सुरू केला आहे.देसाईगंज तालुक्यातील ग्रामीण भागातील गोरगरीब कुटुंबातील सर्वच सदस्य रुग्णांसाठी वर्षभर मोफत तपासणी सुविधा सुरू करण्यात आली असल्याने याचा लाभ गोरगरीब कुटुंबातील सदस्यांनी घेण्याचे आवाहन बनसोड हॉस्पिटल देसाईगंजचे संचालक डॉ.श्रीकांत बनसोड यांनी केले आहे.

डॉ.श्रीकांत बनसोड हे नेहमीच गोरगरीब,गरजू व ज्यांच्याकडे आर्थिक परिस्थिती नाजूक आहे; अशांचा विचार करून मोफत वा कमीत कमी फी आकारून नेहमीच आरोग्य सुविधा देत असतात.डॉ.बनसोड यांनी २०१८ पासून ते आजतागायत ५ वर्षाखालील बालकांची संपूर्ण तपासणी मोफत सुरू केली होती.अशातच पुन्हा आता व्याप्ती वाढवून ग्रामीण भागातील सर्व जनतेसाठी ५ वर्षाखालील बालकांसाठी मोफत करण्यात येणार असल्याचे बनसोड यांनी म्हटले आहे.

कोरोना कालावधीत हॉस्पिटलच्या माध्यमातून कोरोना रुग्णांवर ४ महिने मोफत उपचार करून पोलीस परीवारातील सदस्य व ग्रामीण भागातील असंख्य रुग्णांना उपचाराच्या माध्यमातून लाभ दिले आहे.अशातच पुन्हा एकदा डॉ.श्रीकांत बनसोड यांनी देसाईगंज तालुक्यातील ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेसाठी वर्षभर मोफत तपासणी करून रुग्णसेवा देण्याचा संकल्प केला आहे.त्याचप्रमाणे कार्ड धारक रुग्ण,भरती योग्य असल्यास हॉस्पिटल बिल मध्ये ३०% सूट देण्यात येणार आहे.बनसोड हॉस्पिटल हे देसाईगंज येथील एकमेव सर्जिकल रूग्णालय असून,त्याठिकाणी आकस्मिक सिजेरियन प्रसूती,हायड्रॉसिल,अपेंडिक्स,हरणीया व मूळव्याधची शस्त्रक्रिया होते.त्यासाठी डॉ.प्रशांत झोडे,डॉ.मनोज बुद्धे, डॉ.निकेश खोब्रागडे,डॉ.प्रिती सावजी,डॉ.जयंत परवते,डॉ.स्नेहा परवाते, डॉ.अमोल लीचडे यांची विशेष सेवा उपलब्ध आहे.याचा सुद्धा लाभ सदर रुग्णांना देण्यात येणार आहे.रक्त मल आणि मूत्र तपासणीत सुध्या लाभ देण्याचे डॉ.श्रीकांत बनसोड यांनी जाहीर केले आहे.

तपासणी सुविधा १ मार्च २०२३ पासून २८ फेब्रुवारी २०२४ पर्यंत ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेसाठी ओपीडी च्या माध्यमातून कुटुंबातील सर्वच सदस्यांसाठी वर्षभरातून कितीही वेळा मोफत तपासणी सुविधा देण्यात येणार असल्याने याचा लाभ तालुक्यातील जनतेंनी घेण्याचे आवाहन डॉ.बनसोड यांनी केले आहे.

हॉस्पिटल पत्ता-मधुबन कॉलनी,गांधी वार्ड,बनसोड हॉस्पिटल देसाईगंज(वडसा).

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता तीन कल्याणकारी योजनांना इंदिरा गांधींच्या नावाऐवजी ‘प्रधानमंत्री’ शब्द..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली.या पार पडलेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने तीन कल्याणकारी योजनांची नावे...

गडचिरोली जिल्ह्यातील ९६ रेतीघाटांचे होणार लिलाव; सूचना व हरकती सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील वाळू व रेती उत्खननासाठी योग्य स्थळांचा समावेश असलेला सन २०२६-२७ चा प्रारूप जिल्हा सर्वेक्षण अहवाल नागरिकांच्या अवलोकनासाठी www.gadchiroli.gov.in या संकेतस्थळावर...

कारची सायकलला जोरदार धडक; सायकलस्वाराचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-रात्रीच्या सुमारास सायकलने घरी परतणाऱ्या एका शेतकऱ्याला भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात सायकलस्वार शेतकऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर धडकेनंतर...

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना मिळणार दिवाळीपूर्वीच दोन हजाराची भाऊबीज भेट..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनीसांसाठी आनंदाची बातमी असून या सर्वांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!