Thursday, October 15, 2026
Homeभंडाराट्रकने, ट्रॅक्टरला मार्ग न दिल्याने ट्रॅक्टर थेट नदीत कोसळून एक जण ठार...

ट्रकने, ट्रॅक्टरला मार्ग न दिल्याने ट्रॅक्टर थेट नदीत कोसळून एक जण ठार तर दोघेजण जखमी- लाखांदूर-पवनी मार्गावरिल चुलबंद नदी पुलावरील आजची घटना…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

भंडारा :- जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील पवनी येथे ट्रकने,ट्रॅक्टरला मार्ग न दिल्याने ट्रॅक्टर थेट नदीत कोसळल्याने ट्रॅक्टरवरील एक जागीच ठार तर दोघेजण गंभीर जखमी झाले असल्याची घटना आज दुपारच्या सुमारास लाखांदूर-पवनी मार्गावरिल चुलबंद नदी पुलावर घडली.यामध्ये अण्णा पारधी वय ५० वर्षे असे मृतकाचे नाव आहे तर राष्ट्रपाल ठाकरे वय ५० वर्षे,राध्येश्याम ढोरे व्य ४४ वर्षे असे गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत.

लाखांदूर येथील शेतकरी राष्ट्रपाल ठाकरे यांनी आपल्या शेतातील कडधान्य बाजार समिती येथे नेण्याकरिता आपल्या ट्रॅक्टरमध्ये भरून सहकारी अण्णा पारधी व राध्येश्याम ढोरे यांच्या सोबत ट्रॅक्टरवर निघाले होते. लाखांदूर-पवनी मार्गावरिल चुलबंद नदीवरील पुलावरुन समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने मार्ग दिला नसल्याने ट्रॅक्टर चालकाने आपला बचाव करण्यासाठी साईडला घेताना ट्रॅक्टर सरळ ३० फुट पुलावरुन नदीमध्ये खाली कोसळला.यात अण्णा पारधी यांचा जागीच मृत्यु झाला असून राष्ट्रपाल ठाकरे यांचा पाय मोडला असून राध्येश्याम ढोरे हे ही गंभीर जखमी झाले.घटनास्थळी बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली व लगेच जखमींना उपचारासाठी लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.सदर घटनेचा तपास पोलीस प्रशासन करीत आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना दिलासा; दिवाळीपूर्वी मिळणार पाच हजार रूपयांची मदत..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-महाराष्ट्र राज्य सरकारने दुष्काळग्रस्त यादीत ४० नवीन तालुक्यांचा समावेश केल्यामुळे ३५८ पैकी एकूण ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे.अश्यातच खरीप...

आता राज्यातील ३०५ तालुके अंतिमतः दुष्काळी तालुके म्हणून घोषित.. – आणखी ४० तालुक्यांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील खरीप हंगामातील दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता राज्य सरकारने दुष्काळग्रस्त तालुक्यांबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे.यापूर्वी ट्रिगर-१(प्रथम कळ)अंतर्गत २६५ तालुके दुष्काळी तालुके म्हणून...

संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात मनाई आदेश जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आगामी सण-उत्सव,नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक तसेच संभाव्य आंदोलने व सार्वजनिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा...

आमदार रामदास मसरामांनी आश्रमशाळा व मृतक विद्यार्थीनीच्या कूटूंबियांची घेतली भेट.. -पोलीस निरीक्षकांना आत्महत्या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची सूचना..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा तालुक्याच्या शासकीय आश्रमशाळा सोनसरी येथील आठव्या वर्गाची विद्यार्थीनी राणू क्रिष्णा हलामी रा.मोहगांव हिने वसतिगृहातच गळफास घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना सोमवार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!