उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली) :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव व विश्वकर्मा जयंतीचे औचित्य साधून मंत्री मंगलप्रभात लोढा,रोजगार,उद्योजगता व नाविन्यता विकास मंत्रालय व दिगंबर दळवी,संचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मुंबई यांच्या सूचनेनुसार संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सर्व आय.टी.आय.मध्ये ‘द्वितीय कौशल्य पदवीदान’ सोहळे आयोजित करण्यात आले.त्यानुसार आज १७ सप्टेंबर २०२३ रोजी देसाईगंज औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे ‘द्वितीय पदवीदान सोहळा’ संपन्न झाला.
अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा जुलै-२०२३ मध्ये नागपुर विभागातून प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेले संस्थेतील जोडारी व्यवसायातील प्रशिक्षणार्थी सौरव बाटबर्वे,यांत्रिक मोटारगाडी व्यवसायातील प्रशिक्षणार्थी नितेश ढोंगे व जोडारी व्यवसायातील प्रशिक्षणार्थी कुंदन दुपारे यांचा नागपुर येथे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री,मंत्री मंगलप्रभात लोढा,रोजगार,उद्योजगता व नाविन्यता विकास मंत्रालय महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

संस्थेचे प्राचार्य सुरेश एस.चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही कार्यक्रमाचे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था देसाईगंज येथे आज १७ सप्टेंबरला सकाळी ७ वाजता प्रधानमंत्री रन फॉर स्किल मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले.सदर स्पर्धेला कृष्णा गजबे आमदार यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरवात केली.तसेच सकाळी ११ वाजता पदवीदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमास मॅरेथॉन स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांचा मुले व मुली यांना प्रत्येकी अनुक्रमे ३ हजार रुपये,२ हजार रुपये व १ हजार रुपये धनराशी व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.त्याचप्रमाणे संस्थेतील व्यवसायनिहाय प्रथम तीन विशेष प्रावीण्य मिळवून उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा मुख्य अतिथि कृष्णा गजबे आमदार आरमोरी विधानसभा क्षेत्र यांच्या हस्ते व आफताब आलम खान ए.ए.एनर्जी लिमिटेड वडसा यांच्या अध्यक्षतेखाली प्रमाणपत्र व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमाला राजरतन मेश्राम प्रेस क्लब सचिव पत्रकार व विलास ढोरे जेष्ठ पत्रकार प्रामुख्याने उपस्थित होते.आमदार गजबे उदघाट्नपर मार्गदर्शनात संबोधन केले की, प्रशिक्षणार्थ्यांना आपल्याला जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर युवकांनी निराश न होता सातत्याने प्रयत्न केले पाहिजे.जीवनात अशक्य असे काहीही नाही.आपण आपल्या आवडीच्या क्षेत्रात कौशल्य विकसित करून, रोजगार व स्वयंरोजगाराची कास धरावी; असे अमूल्य प्रतिपादन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी केले.

सदर कार्यक्रमाचे संचालन व्ही.वाय.नागमोती व आभार प्रदर्शन सी.डी.समर्थ यांनी केले.सदर कार्यक्रम यशस्वी होणेकरिता संस्थेचे गटनिर्देशक रविकान्त गोतमारे,श्रीमती माया जाधव,के.एस.उमक, गुणवंत वांढरे,दीपक बोकडे,राकेश भोयर,टी.यू.सोयाम,बादल घरडे,कु.के.पी.बोन्द्रे,राहुल कराडे,श्रीमती.एन.डी. भडके, कु.एस.एस.प्रधान,संस्थेतील सर्व कर्मचारी वृंद, आजी-माजी प्रशिक्षणार्थी व सुरक्षा रक्षक यांनी सहकार्य केले.तसेच सदर कार्यक्रमास मोठ्या संख्येने पालक वर्ग उपस्थित होते.