Monday, May 25, 2026
Homeगडचिरोलीपती,पत्नीसह जहाल नक्षलवाद्यांस अटक...-२ कोटींच्यावर वर होते बक्षीस…

पती,पत्नीसह जहाल नक्षलवाद्यांस अटक…-२ कोटींच्यावर वर होते बक्षीस…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- नक्षल चळवळीत गेल्या ३० वर्षापासून कार्यरत असलेल्या नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य नक्षल नेता संजय राव उर्फ दीपक याला पकडून देण्यासाठी दोन कोटींचे बक्षीस जाहीर केले होते.अशा नक्षलवादीला पत्नीसह तेलंगणा पोलिसांनी अटक केली आहे.

दीपक हा महाराष्ट्रातल्या अंबरनाथ येथील मूळ रहिवासी असून कश्मीरमध्ये बीटेकच शिक्षण घेतल्यानंतर तो महाराष्ट्रात परतला.त्यानंतर नक्षल चळवळीत तो सामील झाला. महाराष्ट्रासह काही राज्यात त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत. या दरम्यान पुणे जिल्ह्यात तळेगाव दाभाडे येथे २०१५ मध्ये पोलिसांनी टाकलेल्या धाडीत तीन जणांना अटक झाली होती.त्यावेळी संजय तिथून निसटला होता. नक्षल चळवळीशी संबंधित काही साहित्य,शस्त्र आणि रोख रक्कम त्या ठिकाणी सापडली होती.

सध्या संजयकडे कोकणसह पश्चिम घाटात नक्षल चळवळ मजबूत करण्याची जबाबदारी आणि पश्चिम घाट विशेष क्षेत्र समितीचा तो सदस्य होता. नक्षलवाद्यांच्या सर्वात मोठ्या केंद्रीय समितीचा सदस्य असलेल्या संजयवर महाराष्ट्र सरकारने ५० लाखाचे तर इतर राज्याचे मिळुन दोन कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.मात्र तेलंगणा पोलिसांनी संजयसह त्याच्या पत्नीला देखील अटक केली आहे. संजयची पत्नीही नक्षल असुन तिलाही बंगलुर येथून पोलीसांनी अटक केली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागरिकांनो जीवाची काळजी घ्या; आजपासून नवतपाला सुरुवात.. – सर्वाधिक तापमानाचे नऊ दिवस..

उद्रेक न्युज वृत्त :-काही दिवसांपासून सूर्यदेवता विदर्भातील जीवसृष्टीवर कोपला की काय?अशी स्थिती निर्माण झाली आहे.सूर्य मोठ्या प्रमाणावर आग ओकू लागल्याने विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये उष्ण...

नागरिकांनी लोकशाही दिनात तक्रारी व निवेदने सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन  येत्या,सोमवार १ जून २०२६ रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथील सभागृहात करण्यात आले आहे.जिल्ह्यातील नागरिकांनी...

देशात जनगणनेची प्रक्रिया सुरू झाली; पण ओबीसी समाजासाठी स्वतंत्र रकानाच नाही.. देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर धडकणार ‘भव्य मोर्चा’..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- "आमची संख्या,आमचा हक्क,आमचा सन्मान!" आणि "जनगणनेत स्वतंत्र कॉलम,आमचा हक्क!" अशी गगनभेदी गर्जना करत देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात...

रोजगार हमी योजनेच्या कायद्याची जागा घेणाऱ्या ‘व्हीबी-जी राम जी’ योजनेत १२५ दिवस काम देण्याची हमी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच कालावधीपासून सुरू असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-२००५ कायद्याची जागा आता 'विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजिविका...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!