Sunday, October 25, 2026
Homeदेसाईगंजकोंढाळा येथील इसमाचा गावातील बैठकीवरच झाला मृत्यू....-आज दुपारची घटना….

कोंढाळा येथील इसमाचा गावातील बैठकीवरच झाला मृत्यू….-आज दुपारची घटना….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

संपादक/सत्यवान रामटेके

देसाईगंज(गडचिरोली) :- तालुक्यातील कोंढाळा येथील इसमाचा गावामध्ये ठेवण्यात आलेल्या बैठकीवरच विसावा घेतांना मृत्यू झाल्याची घटना आज १७ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान उघडकीस आली असल्याने गावात हळहळ व्यक्त केले जात आहे. 

प्राप्त माहितीनुसार,कोंढाळा येथील खटू ऊर्फ प्रभाकर रामा बुराडे वय अंदाजे ५२ वर्षे हे काही काम करून घरी परत जात असतांना, त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने वार्ड क्रमांक ४ येथील राजू शिवणकर यांच्या घरासमोरील परिसरात ठेवण्यात आलेल्या बैठकीवर विसावा घेतला; विसावा घेत असतांना घरा नजिकचे काही नागरिक त्यांना आवाज देऊन उठविण्याचा प्रयत्न करीत असतांना बुराडे यांनी कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नसल्याने गावातील पोलीस पाटील किरणताई कुंभलवार यांना सदर घटनेची माहिती देण्यात आली.माहिती देताच पोलीस पाटील यांनी घटनास्थळ गाठून शहानिशा केली असता,प्रभाकर बुराडे यांची प्राणज्योत मावळली असल्याचे दिसून आले.सदर घटनेची माहिती देसाईगंज पोलीस ठाण्यातील कोंढाळा बिट अंमलदार मदन मडावी तसेच जांभूळकर यांना देताच घटनास्थळी दाखल होऊन संपूर्ण माहिती व शहानिशा करून ठाणेदार किरण रासकर यांना कळविण्यात आल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-सिंदेवाही शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या पळसगाव जाट येथील शेतशिवारात वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल शनिवारच्या सायंकाळी...

आज चंद्राच्या लख्ख प्रकाशाची अनुभूती देणारी कोजागरी पौर्णिमा..

उद्रेक न्युज वृत्त :-धार्मिक श्रद्धा,कौटुंबिक स्नेह आणि सांस्कृतिक परंपरांचा संगम असलेल्या शरद ऋतूच्या प्रसन्न वातावरणात चंद्राच्या लख्ख प्रकाशाची अनुभूती देणारी कोजागरी पौर्णिमा आज,रविवार २५...

सोने-चांदीच्या दरांमध्ये घसरणीची मालिका सुरू; किंमती कमी होण्याचा सपाटा..

उद्रेक न्युज वृत्त :-सणासुदीच्या काळात सोने-चांदीच्या दरात झालेल्या घसरणीमुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळू लागला आहे.आज,शनिवार २४ ऑक्टोंबर रोजी इंडीयन बुलियन मार्केटनुसार, देशभरात १० ग्रॅम...

एटापल्लीतील ३० गावांत जलसुरक्षा व शाश्वत उपजीविकेसाठी कार्यक्रम; ९६० कोटी लिटर अतिरिक्त जलक्षमता निर्माण करण्याचे उद्दिष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील ३० आदिवासी गावांमध्ये जलसुरक्षा बळकट करणे,शेतीची उत्पादकता वाढविणे आणि शाश्वत उपजीविकेच्या संधी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!