Thursday, July 16, 2026
Homeदेसाईगंजअखेर  'टी-१४' वाघिणीला केले जेरबंद...- देसाईगंज तालुक्याच्या फरी येथील महिलेला केले होते...

अखेर  ‘टी-१४’ वाघिणीला केले जेरबंद…- देसाईगंज तालुक्याच्या फरी येथील महिलेला केले होते ठार…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

संपादक/सत्यवान रामटेके 

देसाईगंज(गडचिरोली) :- देसाईगंज तालुक्यातील फरी येथील महानंदा दिनेश मोहुर्ले नामक महिलेस ११ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास शेतामध्ये काम करीत असतांना ‘टी-१४’ वाघिणीने हल्ला चढवून ठार केले होते.त्यानुसार गावातील व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी एकच जमाव करून वाघ,वाघीण व जंगली हत्तींचा बंदोबस्त करण्यात यावा; अन्यथा वाघिणीच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचा मृतदेह शविच्छेदनासाठी नेण्यास नागरिकांनी मज्जाव केला होता.त्यानुसार वडसा वन विभागाचे सहाय्यक वन संरक्षक(ACF) मनोज चव्हाण यांनी ‘रेस्कु टीम’ ला पाचारण करीत वाघिणीची शोध मोहीम राबविली असता आज १७ सप्टेंबर २०२३ रोजी अखेर ६ दिवसांनी ‘टी-१४’ वाघिणीला पकडण्यास वन विभागास यश आले आहे.

सदर वाघीण शिवराजपुर जवळील चिखली रिठ येथील कक्ष क्रमांक-८६६ येथून आज सकाळी ६.४५ वाजेच्या दरम्यान जेरबंद करण्यात आली आहे.सध्याच्या घडीला कोंढाळा-उसेगाव,फरी व इतर जंगल परिसरात ‘टी -२’ वाघिणीचे पिल्ले व इतर वाघांचे वास्तव्य असल्याची माहिती आहे.त्यानुसार ‘टी -२’ वाघिणीचे पिल्ले मोठे झाल्यास जंगल परिसरात स्वतंत्र भ्रमंती करीत असतात. त्यातीलच एक दीड वर्षाची मादी म्हणजेच ‘टी-१४’ वाघिणीने फरी येथील महिलेस शेतात काम करीत असतांना ठार केले होते. त्यानुसार गावकऱ्यांचा रोष पाहून वाघिणीला जेरबंद करून नागपूर येथील गोरेवाडा याठिकाणी नेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दहावीत शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार; दोन आरोपी फरार..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यात एक धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.दोन नराधमांनी इयत्ता दहावीत शिकणाऱ्या मुलीच्या असह्यतेचा गैरफायदा घेत पैश्याचे आमिष दाखवून वारंवार...

गुरुजींची डोकेदुखी वाढली; विविध जबाबदारीचे ओझे लादून गुणवत्तेची अपेक्षा.. -पाणी डोक्याच्यावर गेल्यास काय खाक गुणवत्ता वाढणार?

उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली शिक्षकांची अवस्था "ना घर के ना घाट के" अश्या प्रकारची झाली आहे.एक काळ होता जेव्हा शिक्षकाच्या हातात खड्डू आणि पुस्तक...

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या निकषात सुधारणा..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ च्या निकषात सुधारणा करण्याचा निर्णय मुंबई येथे मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र...

अखेर प्रतीक्षा संपली; लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणींची अखेर प्रतीक्षा संपली असून मागील महिन्याच्या दीड हजाराची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे.जून महिना संपून जुलै...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!